मराठवाडा मुक्तीसंग्राम मध्ये वैजापूरचे योगदान काय आहे ..... - Vaijapur News

Breaking

Tuesday, September 17, 2019

मराठवाडा मुक्तीसंग्राम मध्ये वैजापूरचे योगदान काय आहे .....

वैजापूर हे मराठवाडयाचे प्रवेशद्वार समजला जातो . शहराला ऐतिहासिक धार्मिक महत्व आहे .  वैजापुरात निजामांची राजवट होती . निजाम सरकारचे जुलमी प्रशासन घालविण्य्साठी व रझाकारांच्या जुलमानां विरोध करून संघर्षं  देण्यासाठी वैजापूरचे युवकांनी पुढाकार घेतला होता .महादेवसिंग,विजयंद्र काबरा ,बन्सीलाल लड्डा ,अमृत गडकरी यांनी वैजापूर तालुका व नांदेड जिल्यातील काही तरुण एकत्र आणले यात वैजापूरयेथील जगन्नाथ भालेराव ,प्रभाकर हरिदास ,रामलाल राजपूत ,जयराम भोसले ,बबन मापारी ,यांचा समावेश होता . जगन्नाथ भालेराव हे अग्रस्थानी होते . प्रखर निष्ठा ,प्रखर राष्ट्र प्रेमाने भरलेले यांचे मन होते .  या सर्व युवकांसाठी  येवला येथे डॉ . कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक शिबीर घेतले . या शिबिरात युवकांना सैनिकी शिक्षण दिले . राष्ट्रनिष्ठा  या युवकात निर्माण केली व लढवू सैनिकी वृत्ती निर्माण करून संघटना बनवली . हत्यारे मिळवून गनिमी कावा ने लढणे शिकवले .                                                                                                वैजापूर तालुक्यात वेगवेगळ्या गावी फिरून यातील काही युवकांनी आणखी युवक जोडले . काहींना निजामाच्या लोकांनी अटक केली . परंतु  जगन्नाथ भालेराव व त्यांचे सहकारी जराही डगमगलेनाही . वैजापूर तालुकयातील सिमेवरील गांवची पहाणी करून सरला ,गोवर्धन ,महांकाळवाडगाव ,व गोवर्धनपूर येथे निजाम सैनिकांवर हमला करून या गांवाना मुक्त केले त्या नंतर तिरंगा उभारुन अधिकृत जनराज्य स्थापन करण्यात आले   या गावातील गावकऱयांनी घरोघरीं गुढी उभारून उत्सव साजरा केला . निझामशासनाच्या जुलुमास न जुमानता जनराज्याचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा करण्यात आली   . जनराज्यातील या  युवा सैनिकांच्या दहशतीनं आसपासच्या गावातील रझाकार कमी होऊ लागले . अशा प्रकारे जनराज्याची पकड घट्ट होत चालली होती . एके दिवशी जनराज्याचे रक्षण करीत असतांना नागमठाण व जातेगांवला रझाकार आल्याचा सुगावा भालेराव यांना लागला त्यानी आपल्या सहकाऱ्यासोबत धाव घेतली . ३०-४०  रझाकार तेथे होते त्यानी  पिटाळून लावले                                                                                                                                                पुढे      मराठवाडा मुक्तीसंग्रामला  उग्र स्वरूप प्राप्त झाले १३ सप्टेंबर १९४८ ला पोलीस अक्शन होऊन या राजवटीचा अस्त झाला .चार दिवसांनी म्हणजे १७    सप्टेंबर१९४८ मराठवाडा स्वतंत्र झाला . हुतात्मा जगन्नाथ भालेराव यांच्या बलिदानाची आठवण  वैजापूर व मराठवाडा कधीच विसरणार नाही

No comments:

Post a Comment