स्वच्छता हा सर्वोत्कृष्ट संस्कार होय--डी,डी,राजपूत - Vaijapur News

Breaking

Friday, September 27, 2024

स्वच्छता हा सर्वोत्कृष्ट संस्कार होय--डी,डी,राजपूत


वैजापूर ता,२८
वैजापूर शहरात "स्वच्छता ही सेवा २०२४"अंतर्गत विविध उपक्रमांनी शहरातील नागरिकांत  व विद्यार्थी वर्गात स्वच्छता  जागृती करण्यात येत आहे.याचा एक भाग म्हणून शनिवार(ता,२८)रोजी येथील पीएमश्री मौलाना आझाद  विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांची "स्वच्छता सायकल रॅली"काढून संपूर्ण वैजापूर वाशियात स्वच्छता जागृती करण्यात आली.या स्वच्छता फेरीला
पालिकेचे स्वच्छता दूत व शहरातील जेष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी हिरवा ध्वज दाखविला,या प्रसंगी विद्यार्थी व नागरिकांना त्यांनी विशद केले की,"स्वच्छता हा सर्वोत्कृष्ट संस्कार असून,परिसर स्वच्छता सोबत विचार, आचार,व संचारात ही स्वच्छता आणल्यास राष्ट्रपिता महात्मा गांधींचे स्वच्छता स्वप्न साकार होईल".या प्रसंगी सेवा निवृत्त मुख्याध्यापक बी,वाय, त्रिभुवन, मौलाना आझाद विद्यालयच्या  मुख्याध्यापीका नीता पाटील,पर्यवेक्षक एम,आर, गणवीर, यांची प्रमुख उपस्थिती होती.या स्वच्छता फेरी चे नियोजन शिक्षक संदीप शेळके,बी,बी,जाधव व सुवर्णा बोर्डे यांनी केले होते.त्यांना राजश्री बंड, ज्योती दिवेकर,वैशाली पगारे,लता सुखासे ,पल्लवी टाकळकर ,यांनी सहकार्य
केले,या प्रसंगी स्वच्छता संदेश घराघरात पोहचावा म्हणून विद्यार्थी यांची स्वच्छता  साखळी ही करून स्वच्छता संदेश देण्यात आला. विद्यार्थी वर्गात स्वच्छता रुजावी  म्हणून स्वच्छता विषयावर चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा ही पीएमश्री मौलाना आझाद विद्यालयात आयोजित करण्यात आल्या.स्वच्छता हीच सेवा-२०२४ "चा समारोप येत्या २ ऑक्टोबर ,राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती  दिनी होणार आहे.शेवटी या कार्यक्रमाचा समारोप बी,बी,जाधब व सुवर्णा बोर्डे यांनी केला.

No comments:

Post a Comment