जागतिक अल्झायमर(स्मृतिभ्रंश)दिन निमित्त पालिका वाचनालयात शनिवार(ता,२१) रोजी दुपारी १२-००वाजता जेष्ठ नागरिकांसाठी अल्झायमर(स्मृतिभ्रंश)या विसरण्याचा आजाराची माहिती देण्यासाठी जेष्ठ नागरिक इकबालसिंग पंजाबी यांच्या अध्यक्षत्याखाली बैठक घेण्यात आली,वैजीनाथ जेष्ठ नागरिक सेवा संघाचे सचिव तथा
जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंग राजपूत यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करतांना विशद केले की,स्मृतिभ्रंश हा आजार ६० वर्षापुढील नागरिकांत मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे,ते पुढे म्हणाले की, ह्या आजाराला जेष्ठ नागरिकांनी बळी पडू नये म्हणून
मोठ्या प्रमाणात कृतिशील असावे, जेष्ठ नागरिकांनी स्वतःला वेगवेगळ्या सामाजिक कामात गुंतवून ठेवावे, वर्तमानपत्रातील शब्द कोडे सोडवावे,एकटेपणांत राहू नये,आपल्या विचारांच्या जेष्ठ नागरिकांत मिसळून गप्पा,गोष्टी कराव्यात.जेव्हढे झेपेल तेव्हढे पायी चालावे, योगासन,प्राणायम करावेत,उजळणी अंक उलटे मोजावेत,हताश, निराश अजिबात राहू नये.धूम्रपान, व अल्कोहल अजिबात करू नये .या बाबी कटाक्षाने पाळल्या तर अल्झायमर हा स्मृतिभ्रंश आजार जेष्ठ नागरिकाना शिवणार नाही.या प्रसंगी जेष्ठ बी,जी,करमासे,यु,बी, पारखे,प्रकाश क्षीरसागर, बबन क्षीरसागर, से.नि. पोलीस निरीक्षक सोपानराव निकम, सुभाष चाफेकर, अमोल वाणी यांच्या सह जेष्ठ
नागरिक उपस्थित होते,शेवटी ग्रंथपाल सहायक संजय राजपूत यांनी आभार मानले.(फोटो कॅप्शन-जागतिक अल्झायमर (स्मृतिभ्रंश) दिन निमित्त या आजाराची माहिती जेष्ठ नागरिकांना देताना धोंडीरामसिंह राजपूत व जेष्ठ नागरिक)
No comments:
Post a Comment