वैजापूरात "श्री" गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात - Vaijapur News

Breaking

Wednesday, September 18, 2024

वैजापूरात "श्री" गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात


वैजापूर ता.१८
प्रचंड कर्कश आवाजाचे डीजे, डोळ्याला घातक असलेले डीजे चे लेझर लाईटस,शोभेच्या दारूचे व फटाक्यांचे धुराचे घातक लोळ ,बारुदचे घातक कण,तसेच रंगीबेरंगी कागदांच्या चिटो-
ऱ्या या सर्वांच्या मध्ये डीजेवर  थरकणाऱ्या तरुणाईचा प्रचंड उत्साह,नाचणे, गाणे, व गणपती बाप्पा मोरया ,पुढल्या वर्षी लवकर या घोषणा देत वैजापूर शहरातील गणेश मंडळांनी रात्री दीड वाजेच्या सुमारास बाप्पाला निरोप दिला,पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला होता, जुमा मस्जिद जवळ रात्रीचे १२वाजताच  ,छत्रपती संभाजीनगरचे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी सर्व  वाद्य वाजविणे थांबविण्यासाठी सूचना केली व वाद्य लगेचच थांबली वाद्य थांबल्यानंतर जुमा मस्जिदच्या समोरील टिळक रस्त्यावर १०-ते१२गणेश मंडळच्या गाड्या मागे होत्या ते सर्व मस्जिद जवळून शांतपणे साडे बारा वाजता निघून गेले,या ठिकाणी उपजिल्हाधिकारी डॉ,अरुण जऱ्हाड,तहसीलदार सुनील सावंत,गंगापूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधीक्षक दिलीप भागवत,माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी, राजुसिंग राजपूत, पंकज ठोंबरे,शांतता समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत,प्रकाश शेठ बोथरा,रामदास टेके, विशाल संचेती,गजानन जाधव,काशिनाथ भावसार  यांची उपस्थिती होती, मध्यनंतरी आमदार रमेश बोरनारे,माजी आमदार,भाऊसाहेब चिकटगावकर,बाळासाहेब संचेती ,राजेंद्र पा,साळुंके, नारायण कवडे,यांनी मिरवणुकीत काही काळ सहभाग नोंदविला,दुपारी स्व,आर,एम,वाणी यांनी स्थापन केलेल्या श्री, स्वामी समर्थ सांस्कृतिक गणेश मंडळच्या मुलींच्या लेझीम पथकाने वैजापूर  वासीयांचे लक्ष वेधले,या मंडळांचे सर्वश्री सचिन वाणी, घनश्याम वाणी,देविदास वाणी, लिमेश वाणी व सी,के,पवार,बापू गावडे व सदस्यांनी  अकरा वाजताच आरती करून मिरवणूक आरंभ केली, पारंपरिक वाद्य या मंडळांनी लावले होते,या समयी स्व,वाणी यांच्या पत्नी श्रीमती सुमनबाई वाणी,व माजी नगराध्यक्ष शिल्पा परदेशी यांच्या हस्ते गणपती आरती झाली,या प्रसंगी एकनाथ जाधव,जे,के,जाधव  यांची उपस्थिती होती,मानाचा गणपती नगर पालिका ,कुबेर प्रतिष्ठाण व एकदंत जैन
गणपती मंडळ यांनी दुपार दोन वाजताच" श्री" मूर्तीचे विसर्जन केले, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे
यांनी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता,प्रत्येक गणेश मंडळाच्या सदस्यांशी संयमाने सूचना करून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरवणूक शांततेत पार पाडण्यात सहभाग नोंदविला,(फोटो कॅप्शन-समारोप प्रसंगी -अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार याना धन्यवाद देतांना डॉ,दिनेश परदेशी, प्रकाश बोथरा व धोंडीरामसिंह राजपूत व ईतर)

No comments:

Post a Comment