येथील नवजीवन प्राथमिक शाळा(आजची मौलाना आझाद विद्यालय) च्या १९८६--१९८७ च्या इयता पहिलीत शिकत असलेल्या ३० विद्यार्थी - विद्यार्थीनी आपल्या वयाच्या ४२-४३ वर्षानंतर एम.एच,-२०
हॉटेल मध्ये रविवार रोजी एकत्र येत स्नेह मिलन अंतर्गत शाळा भरवून आपल्या बालपणीच्या शालेय जीवनातील अनुभवांना पुन्हा जिवंत केले.सर्वांनी आपल्या शालेय जीवनातिल जुन्या आठवणींना उजाळा दिला, या सर्वानी एकत्र येत आपल्या प्राथमिक शालेय जीवनातील विविध आठवणीना नव्याने रंग देऊन यापुढे ही असेच स्नेह मिलन घेऊन मित्र -मैत्रिणीच्या सुख,दुःखात सहभागी होण्याचा संकल्प केला.छत्रपती संभाजीनगर येथील ऊच्च पदस्थ असलेलं अधिकारी भूषण अग्रवाल, अंजली कुलकर्णीक्रांती सूर्यवंशी व अमृता ठाकरे सुरेखा नरवडे यांनी पुढाकार घेऊन हे स्नेहमीलन घडऊन आणले.या कार्यक्रमासाठी त्यांना तत्कालीन समयी शिकविणारे जेष्ठ समाज कार्यकर्ते व सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी ठा,धोंडीरामसिंह राजपूत,व सेवा निवृत्त शिक्षिका शोभा कानिटकर याची उपस्थिती होती.धोंडीरामसिंह राजपूत यांनी या सर्व विद्यार्थ्यांना संबोधित करतांना विशद केले की,ही वर्ग मैत्री अशीच टिकवून ,प्रत्येकाच्या सुख ,दुःखात सहभागी व्हा,एक दुसऱ्यांना सहकार्य करा व हसत,खेळत आनंदी जीवन जगा.भूषण अग्रवाल यांनी हा कार्यक्रम आयोजला त्या बद्धल त्यांचा राजपूत यांनी विशेष सत्कार केला. या समयी या सर्व मित्र-मैत्रिणी यांनी चित्रपट गीते गायिली , राजपूत यांनीही याराना चित्रपटातील"तेरे जैसा यार कहा,कंहा ऐसा याराना"गीत गाऊन मैत्रीचे जीवनातील महत्व विशद केले.या सर्व विद्यार्थ्यांनी
आपल्या जीवनातील प्रेरक व मनोरंजक प्रसंग एक दुसऱ्या सोबत शेअर
केले,स्वादिष्ट नाष्ठा,स्नेह भोजन याचाही यांनी गप्पा-गोष्टी करत आनंद लुटला.आरंभी जे मित्र दिवंगत झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी मनीषा जगताप, सुवर्णा बोर्डे, सविता बनकर पारस पेटारे, रविंद्र आहेर,
आप्पासाहेब जाधव,शेख महमूद,पुष्पेंद्र बापते,सचिन राऊत, शशांक पाटील,ऍड,सवई,पुंडलिक गायकवाड,
श्रीमती जावळे, श्रीमती शोभा वाठोरे, श्रीमती देशमुख,
श्री ,खरात, इत्यादी या स्नेह मिलन समयी उपस्थित होते,(फोटो कॅप्शन- वैजापूर नवजीवन शाळेतील ८६-८७वर्षे च्या वर्ग मित्र स्नेह संमेलन प्रसंगी ठा, धोंडीराम राजपूत, भूषण अग्रवाल, मनीषा जगताप,सुवर्णा, सविता,सुरेखा, आप्पासाहेब आदी)
No comments:
Post a Comment