येथील ब्रहलीन प.पु. स्वामी दत्तगिरी महाराज यांचे समाधी मंदिर बांधकाम दत्तगिरी आश्रमात मागच्या सोमवार पासून आरंभ झालेले आहे.त्या कामाचा आढावा घेण्यासाठी भांगशी माता गड (शरणापूर) येथील श्री,श्री. १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी महाराज व कोपरगाव बेट चे मठाधिपती प.पु. स्वामी रमेशगिरीजी महाराज या द्वयांनी अचानक सोमवार(ता,२३)रोजी दत्तगिरी आश्रमात भेट देऊन या समाधी मंदिराबाबत गुत्तेदार संतोष पवार व बांधकाम देखरेख समिती सदस्यांना समाधी मंदिर बाबत महत्वाच्या सूचना दिल्या.त्यांच्या शुभ हस्ते समाधी मंदिर समोर श्री. फळ ही अर्पण करण्यात आले.आश्रमचे महंत ज्ञानानंदगिरी महाराज यांनी महाराजांचे पूजन केले.सामाजिक कार्यकर्ते व सेवेकरी
ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी व सचिव रामकृष्ण पुतळे यांनी समाधी मंदिर बांधकाम बाबत महाराजांना सविस्तर माहिती दिली.बांधकाम देखरेख समिती सदस्य रामकृष्ण पुतळे, सुनील मोटे,भास्कर गायकवाड, संजय महाजन,डॉ,विजय वाणी,अशोक शेटे, संतोष साळुंके,यांची व सर्व सेवेकरी यांची उपस्थिती होती.समाधी मंदिर काम गतीने व परिपूर्ण होण्यासाठी ज्या देणगीदारांनी जी, जी,देणगी जाहीर केलेली आहे,त्यानी आपली देणगी कमेटी कडे जमा करावी असे आवाहन करण्यात येत आहे. त्रिमूर्ती व पंचमुखी अर्थमूव्हर्स यांनी समाधी मंदिर पाया विना मोबदला खोदून दिला त्या प्रित्यर्थ त्यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते करण्यात आलाशेवटी राजपूत यांनी ऋण व्यक्त केले(.फोटो कॅपशन पपु स्वामी परमानंद गिरी महाराज व पपु स्वामी रमेशगिरी महाराज कामकाज पाहणी करताना).
No comments:
Post a Comment