येथील भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शहरातील सर्व थरातील नागरिक भारतीय संविधान गौरव दिन निमित्त मंगळवार(ता,२४)रोजी एकत्र येऊन या सर्वांनी सर्व प्रथम डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.नंतर सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंह राजपूत यांनी संविधान दिनाची माहिती विशद करीत हा दिन लोकोत्सव म्हणून साजरा व्हावा असे उपस्थिताना आवाहन करीत ,घटनेच्या उद्धेशिकेचे वाचन केले,सर्वांनी सामूहिक वाचन केले ,या प्रसंगी
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पा, साळुंके, डॉ,राजीवजी डोंगरे,युवा सेना चे श्रीकांत साळुंके,सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पडवळ,भाजपा चे गौरव दौडे,रामचंद्र पिलदे, मराठा सेवा संघ चे मोती भाऊ वाघ, महाराष्ट्र नारायणी सेनेचे
अध्यक्ष अशोक पवार (खंडाळकर),रतीलाल गायकवाड, बाळासाहेब त्रिभुवन,सचिन नवगिरे, भागीनाथ मुदगुल,जीवन पठारे,व शहरातील सर्व थरातील नागरिक यांनी उपस्थित राहून भारतीय संविधान गौरव दिन निमित्त उद्धेशिकेच्या सामूहिक वाचनात सहभाग घेतला,आयोजक साहेबराव पडवळ व प्रशांत त्रिभुवन यांनी आभार मानले,(फोटो कॅप्शन-उद्धेशिकेचे वाचन करतांना धोंडीराम राजपूत,शेजारी डॉ,डोंगरे ,श्री पडवळ, राजेंद्र साळुंके)
No comments:
Post a Comment