वैजापूर प्रतिनिधी
दिनांक 21, 22 व 23 नोव्हेंबर रोजी एस डी पी ए हॅन्डबॉल फेडरेशन उत्तराखंड मार्फत रूडकी उत्तराखंड येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत जे. के. जाधव महाविद्यालय वैजापूर येथील संघाने प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. जे के जाधव महाविद्यालयाच्या संघाचा कर्णधार म्हणून अक्षय बच्चू नवले यांनी कर्णधार म्हणून महत्वाची भूमिका बजावत उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून या संघाचा सुनील माधव बावचे याची निवड झाली. याबरोबर रोहित राजू सोनवणे, फैजल अमजद खान, साईराज माधव देवरे, अमन शेख, विशाल भुसारे या खेळाडूंनी देखील प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. महाविद्यालयाच्या हॅन्ड बॉल संघाने मिळविलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष जे. के. जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू भिंगारदेव यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या संघाने मिळवलेल्या यशासाठी डॉ. एन. आर. गायकवाड, प्रा. सागर गवळी, श्री.सय्यद एस एन., श्री.भुजाडे डी बी. श्री.पठारे एम. डी., प्रा. टुपके, प्रा. राऊत यांनी देखील मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment