छत्रपती संभाजी नगर येथे दि.26 रोजी अर्ध सैनिक जवानांनी तहसीलदारांचा जाहीर निषेध केला या संदर्भात अधिक माहिती अशी कि,नासिक चौफुली येथे सर्व अर्ध सैनिक जवान मोठ्या संख्येने उपस्थित झाले,शहीद स्मारकास सर्व जवाणांनी पुष्पहार घालून शहीद जवानांना अभिवादन करून क्रांतिचौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ सर्व जय हिंद माजी सैनिक संघटना व ऑल इंडिया सेंट्रल एक्स पॅरामिलीट्री वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र, अर्ध सैनिक संघटना देऊळगाव राजा,जय जवान जय किसान पार्टी चे अंकुशे यांनी मिळून खेड, पुणे ची तहसीलदार ज्योती देवरे यांनी अर्ध सैनिक जवानांना एका व्हिडीओ क्लिप च्या माध्यमातून तिने 'तोतया सैनिक' म्हटल्या म्हणून निदर्शन करण्यात आले.तिला तात्काळ निलंबित करा देश द्रोहचा खटला चालवा असे ही त्यांनी म्हटले, ज्योती देवरे यांच्या वक्तव्या मुळे 20 लाख अर्ध सैनिक जवा्नांच्या भावना दुखावल्या अर्ध सैनिक शहिदांचा तिने अपमान केला आहे. भारतातुन तसेच महाराष्ट्रातुन रोष निर्माण होत आहे. सर्व ठिकाणाहून मुख्यमंत्री,केंद्रीय गृह मंत्री, पालक मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना पत्र जात आहे.तिच्यावर जर कारवाई झाली नाही. तर राज्यात देशात मोठे आंदोलन छेडनार आहोत असे ही म्हटले,कारण आधीच या जवानांची 2004 नंतर पेंशन बंद केली, काही सुविधा नाही. त्यात असले वक्तव्य करून यांना हीनवण्याचा कार्यक्रम सुरु आहे,काय साध्य करायचे ते तरी सांगा..हे
खपवून घेणार नाही,असे ही या वेळी म्हटले आहे. जय हिंद माजी सैनिक/अर्ध सैनिक संघटनेचे नीलकंठ उल्हारे तसेच ऑल इंडिया सेंट्रल एक्स पॅरामिलीटरी वेलफेअर असोसिएशन चे चेअरमन डि.एम.मघाडे, सेक्रेटरी गौतम गायकवाड, मेजर विठ्ठल काकड, केशव मुंडे बद्री वनवे राधाकिशन सेलके साहेब, सुभाष सानप, बद्री मुंडे साहेब, अरुण सानप, दिनकर काकड साहेब अरुण सुर्वासे साहेब, अशोक वाघ साहेब शेकडो च्या संख्येने पदाधिकारी, सैनिक /अर्धसैनिक जवान उपस्थित होते..
No comments:
Post a Comment