खुलताबाद तालुक्यातील गदाना -बोरवाडी येथीलदुर्लक्षित दैवत वृद्धाश्रमात वृद्धांना दिवाळी भेट - Vaijapur News

Breaking

Friday, October 4, 2024

खुलताबाद तालुक्यातील गदाना -बोरवाडी येथीलदुर्लक्षित दैवत वृद्धाश्रमात वृद्धांना दिवाळी भेट


 वैजापूर-बोरवाडी ता,०५/०६
खुलताबाद तालुक्यातील बोरवाडी  येथील दैवत वृद्धाश्रम अत्यंत दुर्लक्षित असून,या वृद्धाश्रम मध्ये सध्या २६ जेष्ठ वृद्ध निवास करीत आहेत,ते तालुका व 
जिल्हा पासून दूर आहे.या वृद्धाश्रम मध्ये दिव्यांग, निराधार,व मानसिक महिला-पुरुष असून त्यांचे लालन-पालन-पोषण एक सामाजिक जाण असलेल्या
सेवाभावी महिला उमा तुपे हे  दैवत वृद्धाश्रम सेवाभावी संस्था अंतर्गत मायेची फुंकर संचलित  चालवीत आहेत." समाजाच देणं लागत या अंतर्गत हे वृद्धाश्रम उमा तुपे चालवीत असून ,त्या या सर्व प्रकारच्या वृद्धांची मनोभावे सेवा करीत आहेत.
याचे भान ठेवत छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा पेंशनर्स असोसिएशन व खुलताबाद तालुका पेंशनर्स यांच्या वतीने या वृद्धाश्रमातील वृद्ध महिला-पुरुषांची दसरा-दिवाळी गोड व्हावी म्हणून या सर्वांना शुक्रवार(ता,०४)रोजी साडी चोळी,धोतर,शर्ट,टोपी प्रदान करुन बिस्कीट व खाऊ ही वाटप कारण्यात आला.जिल्हा शाखेचे अध्यक्ष वसंत सबनीस, सचिव नामदेव घुगे,वैजापूर पेंशनर्स शाखेचे अध्यक्ष धोंडीरामसिंह राजपूत, खुलताबाद शाखेचे अध्यक्ष मालन घोडके,जिल्हा शाखेचे कोषाध्यक्ष जनार्दन अमृतकर,सहसचिव डॉ ,देशमुख,डी,बी,पाथरीकर,
श्री ,सोनवणे,पद्माकर महाजन यांनी या वृद्धाश्रमातील
सर्व वृद्धांना वरील कपडे वाटप केले,व खाऊ ही वाटप करण्यात आला,या सर्वांनी या वृध्द पुरुष-महिला व दिव्यांग सोबत दोन तास घालविले,त्यांच्या व्यथा व कथा जाणून घेऊन त्यांचे सांत्वन केले,व संचालिका उमा तुपे यांना या जनसेवे बाबत  मनभरून आशीर्वाद दिलेत(फोटो कॅप्शन-वृद्धांना साडी,चोळी,शर्ट,धोतर व कपडे प्रदान करतांना वसंतराव सबनीस,धोंडीराम राजपूत,डॉ,देशमुख, मालन घोडके व इतर)
 

No comments:

Post a Comment