वैजापूरात जि.प.कन्या प्रशाला व जि.प.मुलांची प्रशालेत संगणक कक्ष उदघाटन - Vaijapur News

Breaking

Tuesday, October 8, 2024

वैजापूरात जि.प.कन्या प्रशाला व जि.प.मुलांची प्रशालेत संगणक कक्ष उदघाटन

 
वैजापूर ता,०७
ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचे ज्ञान व शास्त्रीय माहिती अद्यावत असावी व त्यांनी उच्च विद्या विभूषित होऊन  देशाच्या विकास
व प्रगतीला हात भार लावावा व स्वतः स्वावलंबी होऊन उद्यमशील बनावे असे संबोधन माजी उद्योग संचालक जे.के.जाधव यांनी सोमवार(ता,०७)रोजी केले.ते पुढे म्हणाले की यापूर्वी शिवराई, मनूर,सायगव या ठिकाणीही संगणक कक्ष कार्यान्वीत करण्यात आले .त्यानी व माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी या विद्यालयातील संगणक कक्षाचे उदघाटन केले.धोंडीरामसिंह राजपूत यांनी विद्यार्थ्यांना उपदेशित केले,ते म्हणाले की, ज्या देशाचे विद्यार्थी उच्च विद्या विभूषित व संगणकीय ज्ञानाने अद्यावत,उद्यमशील व  परिपूर्ण  असतात  तो देश जगाच्या पाठीवर सर्वच क्षेत्रात उत्तमोत्तम प्रगती करतो, या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी परिपूर्ण संगणकीय ज्ञान आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने घेऊन आपले उज्वल भवितव्य घडवावे असेही राजपूत यांनी पुढे म्हटले.प्रास्ताविक या प्रशालेचे मुख्याध्यापक एस, के,पगार यांनी केले. आरंभी सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.सूत्र संचलन ए.के.सूर्यवंशी यांनी केले.संगणक खुर्चीवर बसून विद्यार्थी की बोर्ड हाताळताना अतिशय प्रफुल्लित दिसत होते. या प्रशालेतील विद्यार्थी तळा गाळातील मागासवर्गीय  कुटुंबातील  व अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत.  या प्रसंगी रझाक  भाई पठाण,बाबा भाई शेख, अमजत भाई,लता दह्याटे ,श्रीमती भोये, प्राचार्य विष्णू भिंगारदेव,सर्वश्री ,निकाळे, विशाल शिंदे,पंजाबी, निंबाळकर, केदार,सय्यद सर,बाबा धुमाळ,मकरंद कुलकर्णी, ठाकूर,यांच्या सह   विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.(फोटो कॅप्शन--धोंडीरामसिंह राजपूत,जे,के,जाधव,व रझाक पठाण,श्री पगार कक्ष उदघाटन करताना).

No comments:

Post a Comment