शहराचे ग्रामदैवत व श्रद्धास्थान असलेले श्री.संकट
मोचन हनुमान मंदिर च्या नूतनीकरण करण व नवीन
अद्यावत बांधकामा साठी आ,प्रा,रमेश पा,बोरनारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना,एकनाथराव शिंदे यांच्या कडील नगरविकास विभागातुन ₹दोन कोटी मंजूर करून मंदिराला दिल्या बद्धल मंदिर विश्वस्त यांच्या वतीने शुक्रवार(ता,११)रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला.सर्वप्रथम त्यांच्या द्वारे हनुमंताची आरती करण्यात आली व नंतर विश्वस्त यांच्या वतीने अध्यक्ष प्रशांत कंगले व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांच्या वतीने आ.बोरनारे
यांचा शाल श्रीफळ,व ज्या प्रतिरुपी त हे मंदिर बनणार आहे,ती "आयोध्ये च्या राममंदिराची"प्रतिरूप प्रतिमा
आ.बोरनारे यांना देण्यार येऊन त्यांचे आभार मानण्यात आले.विश्वस्त काशिनाथशेठ भावसार यांनी
विशद केले की ,मंदिराचे काम आयोध्येतेतील राम मंदिर साठी जे लाल दगड वापरले तेच दगड वापरण्यात येतील.मंदिरात प्रवेश साठी चार प्रवेश दारे
असतील,या प्रसंगी सूत्रसंचलन करून आभार धोंडीरामसिंह राजपूत यांनी मानले.विश्वस्त गोविंदशेठ दाभाडे,केशव आंबेकर,तसेच पुजारी चंद्रकांत कुलकर्णी व कार्यालयीन सचिव अरुण भालेकर यांनी
ही सहभाग नोंदविला.या समयी मंदिरात बाबासाहेब
जगताप,राजेंद्र पा,साळुंके,पारस घाटे, श्रीराम गायकवाड,जवाहर कोठारी,गोकुळ भुजबळ,
गौरव दौडे,संकट मोचन भजन मंडळी बाबासाहेब गायकवाड, विष्णू वाघ,फकिरचंद गायकवाड,ज्ञानेश्वर पवार,गणेश गायकवाड, सजन गायकवाड ,रघुनाथ क्षीरसागर यांच्या सह हनुमान भक्त उपस्थित होते.पुजारी चंद्रकांत कुलकर्णी यांनी आरती गायिली.
(फोटो कॅप्शन-आ,बोरनारे यांचा सत्कार विश्वस्त समितीच्या वतीने करतांना जेष्ठ नागरिक धोंडीराम राजपूत,प्रशांत कंगले,काशिनाथ शेठ भावसार)
No comments:
Post a Comment