आज देशासमोर कुटुंब संस्कृती टिकविणे,पर्यावरण शुद्धीकरण राखणे, जातीय वादाचे वाढते बीज समूळ
उच्चाटीत करणे,राष्ट्रनिष्ठा वाढविणे अशी अनेक आव्हाने आहेत,या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संपूर्ण भारतीय समाज संघटित होणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन देवगिरी प्रांतचे कार्यकारिणी सदस्य विशाल दगडूलालजी दरगड यांनी रविवार(ता,१३)रोजी येथील शिवाजी महाराज मंगल कार्यालयात विजयादशमी निमित्त आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले की, देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर वजन वाढत आहे,हे सुद्धा काही विदेशी शक्तींना सहन होत नाही म्हणून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.आरंभी ध्वजवंदन झाल्यावर शस्त्र पूजन ही करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज,गोळवलकर गुरुजी व डॉ,हेडगेवार यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.आरंभी व्यायाम शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे मनोरे सादर केले.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ, अश्विन जोशी व नगर संघ चालक अतुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात जेष्ठ नागरिक धर्मराज जोशी, हिलालपूर येथील पैठणे गुरू,अशोक मांजरे,सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंह राजपूत,रघुनाथ क्षीरसागर, घनश्याम आसर,ऍड,धर्मसिंग राजपूत, ऍड,कदम,संजय वाणी,उत्तमराव साळुंके, बी,बी,थोरात, साहेबराव साळुंके,ज्ञानेश्वर अनर्थे, सुधीर लालसरे यांच्या सह बरेच नागरिक व संघ सदस्य उपस्थित होते.(फोटो कॅप्शन-देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य विशाल दरगड संबोधित करताना)
No comments:
Post a Comment