वैजापूर ता,२६
विश्वरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे जनक आहेत,त्यांनी देशाला दिलेल्या या अनमोल संविधानावर देशाचा गाडा राज्यकर्ते हाकतात ,भारतीय संविधान राष्ट्रीय ग्रंथ आहे, हा राष्ट्रीय ग्रंथ प्रत्येक देशवासीयांच्या घरा-घरात असावा व त्याचे वाचन देशाच्या प्रत्येक नागरिकाने,शालेय व महाविद्यालयिन विद्यार्थ्यांनी करावे व त्यातील उद्धेशिकेत नमूद केलेल्या प्रत्येक कलमाचे पालन करावे तरच आपला देश डॉ,बाबासाहेबांच्या स्वप्नांचा आदर्श देश जगात ठरेल,असे उदगार शासनाचा डॉ, बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार व पद्मश्री कर्मवीर दादासाहेब पुरस्काराने शासनाने सन्मानित केलेले मराठवाड्याचे जेष्ठ बालहित्यिक धोंडीरामसिंह राजपूत यांनी मंगळवार(ता,२६)रोजी पालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयात आयोजित "भारतीय संविधान गौरव दिन"कार्यक्रमात प्रतिपादित केले.ते पुढे म्हणाले की",भारतीय संविधान गौरव दिन हा लोकोत्सव म्हणून देशभर साजरा व्हावा".
सर्व प्रथम डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून राजपूत यांनी उद्धेशिकेचे वाचन केले .उपस्थित विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी त्यांच्या पाठोपाठ म्हटले.मुख्याध्यापिका नीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कार्यक्रमात उपमुख्याध्यापक
बी,बी,जाधव,राजश्री बंड, ज्योती दिवेकर, सुवर्णा बोर्डे,वैशाली पगारे(शेलार),संदीप शेळके, लता सुखासेयांनी सहभाग नोंदविला आभार बी,बी,जाधव यांनी मानले(फोटो कॅप्शन-भारतीय संविधान उद्धेशिकेचे वाचन करतांना धोंडीरामसिंह राजपूत, बी,बी,जाधव,राजश्री बंड, सुवर्णा बोर्डे, ज्योती दिवेकर
वैशाली पगारे)
No comments:
Post a Comment