वैजापूर ता,२५
देशाचे माजी पंतप्रधान स्व,अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त वैजापूरात जेथे स्व. अटल बिहारी वाजपेयी काही मिनिटे थांबून शहरवाशीयांना संबोधित केले होते, त्याच जागी (महात्मा फुले पुतळा परिसर ) बुधवार (ता,२५) रोजी देशात त्यांच्या जन्म शताब्दी निमित्त चालू असलेल्या कार्याचा भाग म्हणून
"सुशासन" अंतर्गत शहरातील पुतळे सफाई करण्यात येऊन स्वच्छता करण्यात आली, व अटलजींच्या त्या सभेला उपस्थित असणाऱ्या व त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या चार जेष्ठ नागरिक सर्वश्री आघुर येथील भीमराज गायकवाड, व वैजापूरचे गोविंद शेठ दाभाडे, गोपालदास आसर, व ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी त्या दिवसाच्या आठवणीना उजाळा दिला व अटलजी बरोबर चे प्रसंग कथित केले त्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्या हस्ते अटलजींची प्रतिमा व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला,या उजाळा देणाऱ्या जेष्ठांनी या ठिकाणच्या जागेला अटलजींचे नाव देऊन स्मारक उभारावे अशी मागणी केली.तसेच पाठ्यपुस्तकात अटलजी याचे साहित्य समाविष्ट करावे अशी मागणी केली. संजय खंबायते यांनी या ठिकाणच्या जागेला( रस्त्याला)अटलजींचे नावाने स्मारक उभारण्यात येईल असे सूचक वक्तव्य करून सर्वांनी अटलजींच्या कार्याला पुढे नेण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले.
प्रास्ताविक व सूत्र संचलन युवा नेते गौरव दौडे यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष गोकुळभुजबळ यांनी मानले, या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर अण्णा जगताप, सर्वश्री जिल्हा भाजपा सरचिटणीस दशरथ बनकर,डॉ,हेडगेवार बँकेचे चेअरमन प्रशांत कंगले,तालुका भाजपचे कल्याण दांगोडे, भाजपाचे ज्ञानेश्वर आदमाने,शहर अध्यक्ष गोकुळ भुजबळ,सचिव
दामोदर पारीख,तसेच भाजपचे दत्ता पा,धुमाळ महेश भालेराव,महेंद्रकाटकर,श्याम उचित,गौरव दौडे,संदीप ठोंबरे,सुधाकर डगळे,कैलास,लोखंडे,मुकुंद शेठ दाभाडे, प्रकाश शेठ बोथरा,अशोक निकम,किरण खरोटे, अमित भाटिया,यांची उपस्थिती होती,दामोदर
पारीख व धोंडीराम ठाकूर यांनी अटलजींच्या कवितांचे वाचन केले,जवाहर कोठारी, भीमराज गायकवाड,गोपालदास आसर,श्री दघळे यांनी ही मनोगत व्यक्त केले,कल्पना पवार, सुनील घोलप,कमलेश आंबेकर,राहुल घोडके,बाबा तुपे,मुकेश राजपूत, मोहन तुपे,योगेश पवार,प्रवीण सावंत,गोरख घायवत,संतोष पवार,संतोष मिसाळ यांनी सहभाग नोंदविला शेवटी राष्ट्रगीत झाले.(फोटो कॅप्शन-भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते जेष्ठ नागरिक सन्मान करतांना व ईतर)
No comments:
Post a Comment