वीर बाल दिवस निमित्त गुरुद्वारात या चिमुकल्या शहिदांना विनम्र अभिवादन - Vaijapur News

Breaking

Thursday, December 26, 2024

वीर बाल दिवस निमित्त गुरुद्वारात या चिमुकल्या शहिदांना विनम्र अभिवादन


वैजापूर ता,२६
शिख गुरू गोविंदसिहजी यांचे दोन सुपुत्र वीर साहहिब
जादा जोरावरसिंह वीर  आणि साहहिबजादा फतेसिंह यांना देशातील तत्कालीन  राज्यकर्ते  यांनी वयाच्या नऊ व बारा व्या वर्षी आपला धर्म बदलत नाही म्हणून भिंतीत गाडून २६डिसेंम्बर,१७०४ रोजी त्यांना जिवंत ठार मारले  त्या प्रित्यर्थ २६डिसेंम्बर हा दिवस "वीर बाल दिवस"म्हणून संपूर्ण देशात पाळून या छोट्या शहिदांना अभिवादन करावे असे केंद्र सरकारच्या वतीने सूचित करण्यात आल्यावर येथील भारतीय  जनता पार्टीच्या वतीने येथील गुरुद्वारात गुरुवार(त,२६)रोजी "वीर बाल दिवस"म्हणून त्याना अभिवादन करण्यात आले.देशात माजी पंतप्रधान कै,अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्म शताब्दी निमित्त सुशासन  सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत त्याचाच भाग म्हणून सदरील"वीर बाल दिवस" हा कार्यक्रम गुरुद्वारात घेण्यात येऊन या वीर शहीद बालकांना अभिवादन करण्यात आले.या गुरुद्वाराचे गुरू गुरूंदीपसिंह यांच्या सह गुरू ग्यानसिह पोथीवाल,रमेश पंजाबी,रौनक पंजाबी, बलदेव पोथीवाल,दिलजीतसिंग खनिजो,सुरजित कौर व प्रीती कौर,सुलोचना वधवा,कमलेश सबरवाल,कृपालसिह यांच्या उपस्थितीत ह्या कार्यक्रमात गौरव दौडे यांनी प्रास्ताविक केले तर बाळासाहेब चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक ठा, धोंडीरामसिंह राजपूत यांनी या बालवीर शहिदांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले.या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर,चेअरमन प्रशांत कंगले, शहर भाजपा अध्यक्ष गोकुळ भुजबळ,दामोदर पारीख, महेंद्र काटकर,राम उंचीत,श्री दाणे पाटील, गिरीश चापानेरकर,निलेश पारख,नंदकुमार आहुजा,कुमार आहुजा व भाजपाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते,शेवटी प्रशांत कंगले यांनी आभार मानले.(फोट

No comments:

Post a Comment