समाजातील प्रत्येक व्यक्तीना आपले संपूर्ण आयुष्य
नियोजनबद्ध पध्दतीने जगावयाचे असेल तर निरनिराळ्या प्रकारच्या प्रकाशित होणाऱ्या कालदर्शिका या व्यक्ती जीवनात अत्यंत महत्वाची
भूमिका पार पाडतात,यास्तव नियोजनबद्ध जीवन जगण्यासाठी कलदर्शिका हे अत्यंत उपयुक्त साधन आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी व जेष्ठ
साहित्यिक धोंडीरामसिंह राजपूत यांनी शनीवार(ता,२८) रोजी केले.
श्री. राजपूत शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्था शाखा वैजापूर द्वारे आयोजित कालदर्शिका प्रकाशन समयी बोलत होते.ते पुढे म्हणाले की,या संस्थेचे अध्यक्ष किशोर चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली २८वर्षापासून चालत आलेल्या या संस्थेने आपल्या
खातेदारांचा विश्वास संपादन करून राज्यात जवळ पास ११शाखा द्वारे कार्य चालू आहे.सभासदांच्या
ठेवीचे व हिताचे रक्षण करून त्यात वृद्धी व्हावी असे या पतसंस्थचे धोरण आहे.या प्रसंगी सल्लागार सर्वश्री
राजुभाऊ राजपूत,राजेंद्र व्यवहारे,सुनील पाटील,गौरव दौडे, तर प्रमुख उपस्थितीत डॉ,जी, डी,महाडिक,विष्णू
जेजुरकर,कपिल आसर,विजय गोरक्ष,नानासाहेब जगदाळे, कैलास बनसोड,आयुष्य सेठी,वैभव कुंदे,होते
शाखाधिकारी सागर डघळे ,सह शाखाधिकारी कार्तिकी बाहेती,कर्ज अधिकारी रजत शिनगारे, स्नेहा मोरे, सारंगा नढे यांनी स्वागत करून सहभाग नोंदविला(फोटो कॅपशन-कालदर्शिका प्रकाशित करतांना प्रमुख पाहुणे व कर्मचारी)
No comments:
Post a Comment