वैजापूर /संभाजीनगर ता,३०
आज समाजातून माणुसकी हरपत आहे, ही हरपणारी माणुसकी सामाजिक सेवा करणाऱ्या व्यक्ती किंवा सामाजिक संस्था जपण्याची महत्वाची भूमिका पार पाडत आहेत,यापैकी छत्रपती संभाजीनगर येथील सु-लक्ष्मी बहुउदेशीय सेवा भावी संस्था व त्यांचे संचालक
सुमित पंडित व सौ,पूजा सुमित पंडित अत्यंत प्रामाणिक पणे जपत असून त्यांच्या समाजकार्यापासून इतरांनी प्रेरणा घेऊन सामाजिक दायित्व जपावे असे आवाहन छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण)चे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी रविवार(ता,२९)रोजी या संस्थेद्वारे जटवाडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या "माणुसकी वृद्ध सेवालय"या वास्तूचे उदघाटन प्रसंगी केले. ते पुढे म्हणाले की ,संचालक सुमीत पंडित व पूजा पंडित यांचे समाज कार्य म्हणजे",जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले-तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा".समाजाने व कुटुंबाने नाकारलेल्या वृद्ध व्यक्तींकंचा सांभाळ व सेवा करण्याचे कार्य समाजसेवक सुमीत-पूजा हे करीत आहेत ,त्यांची ही सेवा जगी सर्व श्रेष्ठ आहे असेही लांजेवार पुढे म्हणाले.
या प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय(घाटी)
चे माजी अधिष्ठाता भारत सोनवणे,हास्य सम्राट प्रकाश भागवत व वैजापूरचे सामाजिक कार्यकर्ते व
स्वच्छतादूत प्रति गाडगेबाबा ठा,धोंडीरामसिंह राजपुत
संत गाडगेबाबांच्या वेशभूषात होते. या तिघांनीही सुमीत व पूजा च्या या सामाजिक कार्याची प्रशंसा केली.प्रति गाडगेबाबा धोंडीराम राजपूत यांनी सुमित व पूजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प केला.प्रा,सोनवणे यांनी सूत्र संचलन केले,या प्रसंगी समाज क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा प्रमाण
पत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.पत्रकार किरणसिंह राजपूत,चार्ली चॅप्लिन सोनवणे क्षीरसागर, व जटवाडा ग्रामपंचायत चे सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.(फोटो कॅप्शन सुमित-पुजाचा सत्कार करताना अप्पर पोलीस अधीक्षक श्री,लांजेवार व प्रति गाडगेबाबा धोंडीराम राजपूत,श्री भागवत
No comments:
Post a Comment