क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त येथील पालिकेच्या पीएमश्री मौलाना आझाद विद्यालयात शुक्रवार (ता,०३)रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून सावित्रीबाईंच्या स्मृती व कार्याला अभिवादन करण्यात आले.सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला समाज कार्यकर्ते व शासन पुरस्कार विजेते जेष्ठ साहित्यीक धोंडीरामसिंह राजपूत यांच्या हस्ते पुष्पहार टाकून अभिवादन करण्यात आले.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका नीता पाटील होत्या.बी,बी,जाधव व सुभाष गोमलाडू यांनी प्रास्तविक केले.तनया जगदाळे व आरती त्रिभुवन यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण करून त्यांच्या जीवन प्रसंगावर शिक्षण महत्व संवाद रुपात सादर केले.तर आराध्य शेजवळ ने पी,व्ही,सिंधू यांची
भूमिका सादर करून मुली आपल्या कर्तृत्वने विविध खेळात ही चांगली कामगिरी करू शकतात हे दाखवून दिले,आलिशा खान यांनी सावित्रीबाई सोबत शिक्षण कार्य करतांना फातिमा शेख ची भूमिका सादर केली.ज्योती दिवेकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यवर गीत सादर केले.आयेशा शेख, कृष्णा गायकवाड, विजय गायकवाड, धनश्री डुकरे,ऋतूजा आव्हाळे यांनी सावित्रीबाई च्या जीवनातील घटना व प्रसंग सादर केले.या प्रसंगी सुवर्णा बोर्डे,वैशाली पगारे,संदीप शेळके, सुभाष गोमलाडू यांनी सहभाग नोंदविला. सूत्र संचलन कावेरी त्रिभुवन व मंतशा शेख यांनी केले तर आभार आराध्या सोमवंशी यांनी मानले.(फोटो कॅप्शन-सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतांना धोंडीराम राजपूत, नीता पाटील,वैशाली शेलार, सुवर्णा बोर्डे व बी, बी जाधव)
No comments:
Post a Comment