विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला-गुणांना चालना देणारे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ "स्नेहसंमेलन"पोलीस निरीक्षक --श्यामसुंदर कोठाळे - Vaijapur News

Breaking

Friday, January 3, 2025

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला-गुणांना चालना देणारे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ "स्नेहसंमेलन"पोलीस निरीक्षक --श्यामसुंदर कोठाळे


वैजापूर ता,०५
शालेय व महाविद्यालयिन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला,गुण यांना चालना देण्यासाठी "स्नेहसंमेलन"हे उत्कृष्ट व्यासपीठ
होय असे उदगार येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी शुक्रवार(ता,०३)रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत डॉ, बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मागासवर्गीय मुलींचे शासकीय  वसतिगृह
आणि शासकीय निवासी शाळा यांचे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन  प्रसंगी केले.प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षणाधिकारी व शासनाचा डॉ,बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त समाजसेवक धोंडीरामसिंह राजपूत  यांनी ही विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणले की,"विद्यार्थ्यांचे अभ्यासातील सातत्य
,त्यांचा उत्साह,व प्रसन्नता व जोश टिकविण्यासाठी स्नेहसंमेलन काळाची गरज आहे".या प्रसंगी अध्यक्ष मुख्याध्यापक शिवाजी माळी होत,तर मंचवर वैजापूर ग्रामीण-२चे सरपंच दौलत गायकवाड तसेच शासकीय निवासी शाळेचे गृहपाल जनार्दन गव्हाणे , डॉ,बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह चे गृहपाल किशोर सुलाने ,संध्या राजपूत,व ज्योती भोसले यांची उपस्थिती होती.आरंभी थोर महापुरुष व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. प्रास्ताविक जनार्दन गव्हाणे यांनी केले.या शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव करण्यात आला.नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या कला व गुणांच्या माध्यमातून गाणी,नृत्य,व नाटिका सादर केल्या.या समयी विद्यार्थ्यांचे आई-वडील व पालक मोठ्या   संख्येने  उपस्थित होते. लष्करी सेवेत निवड झालेले  पल्लवी देवकर,प्रशांत देवकर,अजय नरवडे यांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला शेवटी मुख्याध्यापक माळी यांनी समारोप करून आभार व्यक्त केले.शाळेच्या सर्व शिक्षक वृंद यांनी सहभाग नोंदविला.(फोटो कॅप्शन स्नेहसंमेलन चे उदघाटन करताना पो,नि, श्यामसुंदर कोठाळे, धोंडीराम राजपूत, शिवाजी माळी, किशोर सुलाने व जनार्दन गव्हाणे)

No comments:

Post a Comment