श्री. क्षेत्र घाटशेंद्रा येथील साई मंडळाच्या वतीने जवळपास तीनशे साई भक्त दरवर्षी शिर्डी साईबाबा
येथे पायी जातात. हे या मंडळाचे आठवे वर्ष आहे.१जानेवारीला निघालेली ही पायी पालखी शिर्डी येथे ६जानेवारीला पोहचली.या पालखीचा मुक्काम वैजापूर येथील शिवप्रतापनगर येथे होता.या वसाहतीत साई भक्त संजय देशमुख व सौ ,मनीषा देशमुख व सेवा निवृत्त तलाठी अशोक आप्पा व सौ,पवार शिवप्रताप- नगर वासीयांनी या पायी पालखी दिंडीचे व साई भक्तांचे उत्साहात व साईबाबा की जय अशा घोषात स्वागत केले.या दिंडी मध्ये अचानक प्रतिसाईबाबा असलेले धोंडीरामसिंह राजपूत हे साईबाबाच्या पोशाखात व बाबा सारखेच हाव-भाव करीत प्रवेशले हे पाहून सर्व भक्त स्तंभित झाले व त्यांनी प्रति साईबाबा सोबत आनंद,व उत्साह नाचत,गात व बाबांचा जयघोष करीत घेतला.संजय देशमुख आणि मनीषा देशमुख यांनी पालखी पूजन केले.शिवप्रतापनगर वासीयांनीही आनंद घेतला,नंतर महाप्रसाद प्रदान करण्यात आला. पालखी सोबत हभप जय शंकरगिरी महाराज मनमाडकर,तसेच संजय देशमुख,सुभाष सुरडकर,विकास गव्हाड, भावडू
देशमुख,खुशाल ढमाले, पंकज खैरनार,करण ढमाले,मिनींनाथ रणधीर, किशोर लोखंडे,अशोक खैरे
अशोक देशमुख ,गजानन देशमुख यांनी पालखी चे सुव्यवस्थित नियोजन केले.संजय देशमुख,मनीषा देशमुख, अशोक आप्पा पवार,सौ,दुर्गाताई काळे,लता पवार,जयश्री जगदाळे, व शिवप्रतापनगर महिला मंडळ यांनी सहभाग नोंदविला .दुसऱ्या दिवशी ही पायी पालखी शिर्डीला रवाना झाली.(फोटो कॅपशन
संजय देशमुख, मनीषा देशमुख, प्रति साईबाबा धोंडीराम राजपूत व अशोक पवार)
No comments:
Post a Comment