राष्ट्रमाता जिजाऊ जन्म उत्सव निमित्त वैजापूरात महापुरुष पुतळ्याना अभिवादन - Vaijapur News

Breaking

Friday, January 10, 2025

राष्ट्रमाता जिजाऊ जन्म उत्सव निमित्त वैजापूरात महापुरुष पुतळ्याना अभिवादन


वैजापूर  ता,१०
राजमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्त शुक्रवार(ता,१०)रोजी मराठा सेवा संघाच्या वतीने शहरातील सर्व  महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन कार्यक्रम सायंकाळी आठ वाजता घेण्यात आला.जिजाऊ ब्रिगेड  वैजापूर च्या अध्यक्षा श्रीमती काळे ताई,उपाध्यक्ष अर्चना जगदाळे,मार्गदर्शक जयश्री जगदाळे,सत्यभामा वाघ,सचिव श्रीमती देशमुख यांच्या सह महिलांनी महाराणा प्रतापसिंह पुतळा ते डॉ, बाबासाहेब आंबेडकर पुतळा मशाल हातात घेऊन सर्व पुतळ्याना  अभिवादन केले.शेवटी छत्रपती  शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी तहसीलदार सुनील सावंत,संजय बोरनारे ,उल्हास ठोंबरे,रणजित चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते ठा, धोंडीरामसिंह राजपूत,अरुण चव्हाण,आयोजक शिवश्री मोती वाघ,शिवाचार्य ज्ञानेश्वर अंभोरे गुरुजी,अण्णासाहेब घायवट,फकिरराव
गलांडे,अर्चना शिंदे,श्रीमती कोळसेताई,श्रीमती कोल्हे ताई, कदम ताई यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन केले,जिजाऊ वंदना झाल्या नंतर ज्ञानेश्वर अंभोरे, व मोती वाघ यांनी प्रास्ताविक केले तहसीलदार सुनील सावंत यांनी ही सिंदखेडराजा येथील माँ जिजाऊ यांच्या वास्तव्य व घराची पूर्ण माहिती दिली ,सूत्र संचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले,आभार शिवश्री मोती वाघ यांनी मानले(फोटो कॅप्शन-तहसीलदार सावंत,संजय बोरनारे,धोंडीराम राजपूत, उल्हास ठोंबरे राजमाता जिजाऊ प्रतिमेला अभिवादन करतांना)

No comments:

Post a Comment