वैजापूर ता,११
गेल्या १२वर्षांपासून अखंडपणे मराठा सेवा संघ वैजापूर च्या वतीने राजमाता जिजाऊ रथ एक दिवस आधी सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रस्थान होतो.याही वर्षी शनिवार(ता,११)रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परीसरातून या राजमाता जिजाऊ रथाला सामाजिक कार्यकर्ते व ज्यांना महाराष्ट्र शासनाने दोन मानाचे पुरस्कार डॉ,बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार व पदमश्री कर्मवीर दादासाहेबगायकवाड पूरस्कार देऊन सन्मानित केलेले वैजापूर चे सामाजिक कार्यकर्ते ठा, धोंडीराम सिंह राजपूत यांनी भगवा ध्वज सकाळी सहा वाजता दाखवुन या रथाला वैजापूर वासियांच्या वतीने शुभेच्छा देऊन रवाना केले.या समयी आयोजक शिवश्री मोतिभाऊ वाघ,जिजाऊ ब्रिगेडच्या सौ ,शोभाताई काळे,पालिकेचे प्र.स्वच्छता निरीक्षक प्रमोद
निकाळे, दीपक साकला,व या रथयात्रेत सहभागार्थ आलेले बंधू -भगिनी उपस्थित होते.(फोटो कॅप्शन-राजमाता रथाला भगवा ध्वज दाखवून वैजापूर वासीयांच्या वतीने शुभेच्छा देताना धोंडीराम राजपूत,मोती वाघ,प्रमोद निकाळे व ईतर)दै
No comments:
Post a Comment