स्वामी विवेकानंदांच्या पांच शक्तीदायी विचारांची व जिजाऊंच्या संस्काराची आजच्या तरुण पिढीला गरज--धोंडीराम राजपूत - Vaijapur News

Breaking

Sunday, January 12, 2025

स्वामी विवेकानंदांच्या पांच शक्तीदायी विचारांची व जिजाऊंच्या संस्काराची आजच्या तरुण पिढीला गरज--धोंडीराम राजपूत


वैजापूर  ता,१२
आज समाजाची व कुटुंबाची ढासळत असलेली अवस्था बघता स्वामी विवेकानंद यांचे पांच शक्तीदायी विचार अनुक्रमे विश्वास व शक्ती, निस्वार्थीपणा,माणूस
घडविणारे शिक्षण, चारित्र्य निर्मिती व मनाची एकाग्रता तसेव व्यसन व विकार मुक्ती या बाबीची आजच्या युवकात व किशोर वयीन मुलां-मुलीत जागृती करून त्यांना देशाचे  आदर्श नागरिक करावे असे प्रतिपादन रविवार(ता,१२)रोजी संकट मोचन मंदिर जवळ सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले.राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त येथील स्वामी विवेकानंद विचार मंच च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .राजमाता जिजाऊ यांच्या बाबत बोलताना राजपूत म्हणाले की,"छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात ज्ञान ,पराक्रम चातुर्य,कर्तव्यदक्षपणा,चारित्र्य  या,सारखे गुण निर्माण करून एक युग पुरुष घडविणारी  राजमाता जिजाऊ या विश्वातील सर्वोत्तम संस्कारी व सर्वगुणसंपन्न माता होया"आयोजक प्रकाश माळी यांनी सदरील कार्यक्रम मंच च्या वतीने ठेवला होता,आरंभी विजय देशमुख व धोंडीराम राजपूत यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. या समयी  बाळासाहेब शिंदे,प्रकाश माळी, फौजी गौतम गायकवाड, विद्याधर सोनवणे,से,नि, प्रा,जवाहर कोठारी,गिरीश चापानेरकर कृष्णा वरखेडे,रामचंद्र पिलदे,श्री,टेके,श्री, भालेराव, यांनीही अभिवादन केले.शेवटी प्रकाश माळी यांनी आभाआभार मानले.(फोटो कॅप्शन-स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करतांना सर्व मान्यवर)

No comments:

Post a Comment