"होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी"ही म्हण ज्या जिवाजींच्या नावाने शिवचरित्रातील इतिहासात नोंद आहे,ते शिवरत्न जिवाजी महाले यांच्या पुण्यतिथी निमित्त मंगळवार(ता.१४)रोजी लाडगाव रस्त्यावरील
शिवरत्न जिवाजी महाले यांच्या पुतळा परिसरात9 त्यांच्या पुतळ्याला अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.आ,रमेश पा, बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे,तसेच जिवाजी महाले समतीचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण,उपाध्यक्ष डॉ,राजीव डोंगरे,सुधाकर आहेर,अशोक पवार खंडाळकर,बाबासाहेब जगताप, दिलीप अनर्थे,सामाजिक कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत, शाहीर अशोक बागुल,रणजित मथुरिया यांनी पुष्पहार व फुल अर्पण करून अभिवादन केले.पुतळा
स्थापन करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ,ते सर्वश्री
अमित अनर्थे,रमेश तोडकर,देविदास अनर्थे,दिलीप विश्वासू,प्रदीप विश्वासू,योगेश वैद्य,रोहित वैद्य यांच्या सह ज्यांनी पुतळा उभारणीत सिंहाचा वाटा उचलला
त्यांचा विशेष सत्कार मान्यवरांनी केला.प्रास्ताविक बाबासाहेब जगताप यांनी केले,
.धोंडीरामसिंह राजपुत यांनी जिवाजी महाले यांच्या जीवन कार्यावर माहिती देऊन प्रतापगडावरील खान व शिवाजी महाराज भेटीचे दृश्य उपस्थिता समोर सादर केले.डॉ,राजीव डोंगरे यांनीही प्रसंगारूप मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी सुनील घोलप, मोती वाघ,ऋषी अनर्थे,पद्माकर अनर्थे,अनिल अनर्थे, सुनिल
व्यवहारे,रमेश तोडकर,व नाभिक समाजातील सर्व सदस्य उवस्थित होते.शेवटी सुधाकर आहेर व दिलीप अनर्थे यांनी आभार मानले.महाराष्ट्र नारायणी सेनेच
अध्यक्ष अशोक आप्पा पवार यांनी डॉ,डोंगरे,संजय बोरनारे, व मोती वाघ यांचा विशेष कार केला.आ,रमेश पा.बोरनारे यांनी आपल्या फंडातून पुतळा परिसर सुशोभित करण्यासाठी ₹दहा लक्ष निधी जाहीर केल्या बद्धल त्यांनाही धन्यवाद करण्यात आले, (फोटो कॅप्शन- शिवरत्न जिवाजी महाले यांच्या पुतळ्याला अभिवादन करतांना मान्यवर)
No comments:
Post a Comment