वैजापूर ता,१५
येथील जगदगुरू नरेन्द्राचार्य महाराज संस्थांन च्या वैजापूर येथील संप्रदायाच्या बुधवार(ता,१५) रोजी उपजिल्हा रुग्णालयात आयोजित"रक्तदान महायज्ञ शिबिराला"पहिल्या दोन तासातच २१रस्क्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.हे शिबिर
सकाळी आठ वाजता आरंभ झाले व ते सायंकाळी ७-००वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.या शिबिराचे उदघाटन आ,रमेश पा,बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे,प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ,राजीवजी डोंगरे व जिल्हा आरोग्य समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते ठा, धोंडीरामसिंह राजपूत यांच्या हस्ते जगदगुरू नरेन्द्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार हार अर्पण करून अभिवादन व दीप प्रज्वलन करून झाले.नरेंद्रचार्य यांचे सामाजिक दायित्व जपणारे हे समाज सेवेचे कार्य महान व राष्ट्र तथा समाज हिताचे असून नागरिकांनी उस्फुर्त पणे यात सहभागी होऊन समाज ऋण फेडावे असे आवाहन डॉ,राजीव डोंगरे यांनी केले,प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम राजपूत यांनी केले.छत्रपती संभाजीनगर येथील दत्ताजी भले रक्तपेढी हे रक्त संकलित करीत आहे,पहिल्या दोन तासात २१दात्यांनी रक्तदान केले.सायंकाळ पर्यंत दोनशे दाते रक्तदान करतील अशी अपेक्षा आहे.प्रथम रक्तदाते श्री निकम व सौ ,जाधवताई यांना राजपूत यांच्या हस्ते प्रमाण पत्र वितरित करून अभिनंदन करण्यात आले.या प्रसंगी उप जिल्हा रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ,रिझवान,डॉ,समृद्धी चव्हाण, डॉ,अभिषेक पाटील, दत्ताजी भाले रक्त पेढीचे डॉ,अमरसिंग सातपुते,निवृत्ती
मोरे, श्याम उचित,महेंद्र काटकर, व संप्रदाय पंथातील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,(फोटो कॅप्शन-रक्तदान शिबिर उदघाटन, रक्तदाते रक्तदान करताना,व रक्तदात्यांना प्रमाण पत्र वितरित करतांना सेवेकरी व मान्यवर)
No comments:
Post a Comment