वैजापूर ता,१७
संपूर्ण भारत देश तंबाखु मुक्त होऊन सर्वांना आरोग्य दायी जीवन मिळावे म्हणून देशातील सामाजिक संस्था, मंडळे, खाजगी रुग्णालये,सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य विभागातील सर्वच घटकांनी सर्वंकष प्रयत्न करून या वर्षात संपूर्ण देश तंबाखू मुक्त करण्यासाठी कंबर कसून प्रयत्न करावेत असे आवाहन तालुका तंबाखू मुक्त समितीचे सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी शुक्रवार(ता,१७)रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित "राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण जनजागृती "कार्यक्रमात केले.त्यांनी उपस्थिताना भारत सरकारच्या तंबाखू व तंबाखूजन्य
पदार्थ नियंत्रण कायदा२००३ अंतर्गत तंबाखू मुक्तीची शपथ ही सर्वांना दिली. जिल्हा सामान्य रुग्णालय संभाजीनगर व कार्यक्रम नियोजनअधिकारी संभाजीनगर तसेच उप जिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ, बी.एन.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीने हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविक व सूत्र संचलन किशोर वाघुले यांनी केले.या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एम.मुंढे,डॉ.दीपमाला मरमट(परदेशी)'तसेच रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी श्रीमती जंगम सिस्टर,मनीषा गायकवाड सिस्टर,तोरणे सिस्टर,पांडे मॅडम,जाधव मॅडम, पाटील मॅडम,माजी सैनिक वाल्मिक तोडकर, कल्याण इस्टके,रविकांत गडकरी,मंगेश मापारी,शशिकांत पाटील,विजय पाटील, उफाडे मॅडम, बापू वाळके,विनायक धामणे,खंडेराव मगर ,मनीषा मुळे, श्रीमती पाटील मॅडम,प्रशांत गिरी, ज्ञानेश्वर भारुड,साई बारगळ,व मोठ्या संख्येने रुग्ण,शहरातील नागरिक उपस्थित होते.शेवटी वाघुले यांनी आभार मानले.(फोटो कॅप्शन-डॉ.बी.एन. मोरे,धोंडीराम राजपुत,डॉ,मुंढे,व आरोग्य कर्मचारी)
No comments:
Post a Comment