जायंट्स ग्रुप ऑफ वैजापूर सहेलीआणि यंग सहेली
यांचे सामाजिक,शैक्षणिक व पर्यावरण पूरक कार्य उल्लेखनीय असून ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत असे प्रशंसनीय प्रतिपादन जायंट्सचे स्पेशल
कमेटी मेंबर विनोद शेवतेकर यांनी शनिवार(ता,१८)
रोजी वैजापूर येथे केले.अध्यक्षस्थानी डॉ,प्रो, गुरुदत्तसिंह राजपूत होते त्यांनीही वैजापूर जायंट्स ग्रुप च्या सामाजिक उपक्रमांची स्तुती करून सदस्यांची पाठ थोपटली.ते जायंट्स ग्रूप ऑफ वैजापूर सहेली व यंग सहेली या ग्रुपच्या नव निर्वाचित सदस्यांच्या पद्ग्रहण व शपथ विधी कार्यक्रमात बोलत
होते.जायंट्स ग्रुप ऑफ वैजापूर सहेलीच्या अध्यक्ष रत्नमाला कुलकर्णी तर यंग सहेलीच्या अध्यक्ष पदी भक्ती जाधव यांची नियुक्ती झाली, त्यांचा सत्कार मावळत्या अध्यक्ष वैशाली साखरे व अंजलीताई जोशी,नरेश गुप्ता व रंजना भावसार व संतोषी भालेराव यांनी केला.वैजापूर जायंट्स चा हा २८वा
पद्ग्रहण आहे.सौ.संतोषी भालेराव यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली.ज्यांनी गत वर्षी उत्कृष्ट कार्य केले त्यांना पुरस्कार ही प्रदान करण्यात आले. कार्यक्रम सूत्र संचलन ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले ,आभार अनघा आंबेकर यांनी मानले.या प्रसंगी डॉ, एस, एम,जोशी, प्रकाश माळी, सुनील देशमानकर, राजू जोशी,निलेश कुलकर्णी,संध्याताई ठोंबरे,मंदाताई
तांबे, अलका साखरे,योगिता साखरे, संगीता भालेराव,अरुणा साखरे,शीतल गुरुदत्त राजपूत, शेवंता
कुलकर्णी, वैष्णवी पाटील, वैष्णवी कंगले, अंजली कंगले, स्वरा भालेराव,विद्या वाळेकर,सौ, दाभाडे ताई,
यांच्या सह उत्कर्ष जेष्ठ महिला नागरिक संघच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून द्वीप प्रज्वलित करण्यात आले.अंजलीताई जोशी व संतोषी लालसरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.(फोटो कॅप्शन-जायंट्स वैजापूर च्या कार्यक्रमात उपस्थित सदस्य)
No comments:
Post a Comment