प्रत्यक्ष सफाई करून स्वच्छतादूत राष्ट्रसंत गाडगेबाबा-यांना वैजापूरात अभिवादन - Vaijapur News

Breaking

Saturday, December 21, 2024

प्रत्यक्ष सफाई करून स्वच्छतादूत राष्ट्रसंत गाडगेबाबा-यांना वैजापूरात अभिवादन


वैजापूर ता,२१
स्वच्छतेचे दूत राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला आणि U डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुण्यतिथी दिनी शनिवार रोजी  पुष्पहार
अर्पण करून डॉ,आंबेडकर पुतळा ते बस स्थानक पर्यंत राष्ट्रीय महामार्ग ७५२च्या दुभाजक वरील केर कचरा,प्लास्टिक पिशव्या व हॉटेल ची घाण स्वच्छ करून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना स्वच्छ सलामी देण्यात आली.
पालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ,संगीता
नांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतादूत व जेष्ठ
सामाजिक कार्यकर्ते ठा, धोंडीरामसिंह राजपूत, व प्रभारी स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे यांनी या स्वच्छता उपक्रमाचा आरंभ केला,धोंडीराम राजपूत यांनी दुकानदार,हॉटेल मालक,व नागरिक बंधू ,भगिनी
यांना स्पीकर मधून आवाहन करतांना विनंती केली  की,आपल्या दुकानातील, घरातील व हॉटेल मधील घाण,केरकचरा  एका डस्टबिन मध्ये साठवून ती घाण
घंटा गाडी आल्यावर त्याच्यातच टाकावी इतरत्र ,गटारीत, दुभाजकावर किंवा रस्त्यावर फेकू नये असेही राजपूत यांनी आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, "स्वछता नांदे ज्या घरी-आरोग्य तेथे वास करी","स्वच्छतेचे गिरवू मंत्र,निरोगी जीवनाचे हेच सूत्र"अशी घोष वाक्ये ही राजपूत यांनी आव्हानीत केली.अण्णा भाऊ साठे पुतळा परिसरातील हातगाडीवाले,भाजी मंडईतील- दुकानवाले,व बस स्थानकात प्रवासी यांच्यात ही स्वच्छता जागृती राजपूत यांनी केली.व शेवटी संत गाडगेबाबा यांच्या स्मृती जागऊन स्वच्छता संकल्प घेतला.बस स्थानकात नियंत्रक श्री गुंजाळ यांच्या समवेत स्थानकावर उपस्थित प्रवासी बंधू -भगिनी यांनाही  स्वच्छता जागृती राजपूत यांनी केली .या समयी त्यांच्या समवेत स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे, सहाय्यक रमेश त्रिभुवन, मुकर्दम चेतन निखाडे,शेख अहमद,प्रथमेश त्रिभुवन,संजय त्रिभुवन, अजय त्रिभुवन, कुणाल दिवेकर,व सफाई  कामगार होते,(फोटो कॅप्शन-संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला व डॉ,आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून स्वच्छता आरंभ करताना धोंडीराम राजपूत, प्रमोद निकाळे व सफाई कामगार)

No comments:

Post a Comment