शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राम मंदिर निकाल प्रश्नी प्रतिक्रिया दिली आहे. - Vaijapur News

Breaking

Sunday, November 10, 2019

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राम मंदिर निकाल प्रश्नी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांच्या पाठोपाठ त्यांचे बंधू शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राम मंदिर निकाल प्रश्नी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी अंतिम निर्णय दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालाचे स्वागत केले असून, आजचा हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक असल्याचं त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

पत्रकार परिषद घेत निकालावर आपली भूमिका स्पष्ट केली असून, विशेष म्हणजे शुक्रवारी (8 नोव्हेंबर) उद्धव ठाकरेंनी अयोध्या प्रकरणाचा निकाल येणार असून या निकालाचे श्रेय कुणालाही घेता येणार नसल्याचं विधान करत भाजपला लक्ष्य केले होते. उद्धव ठाकरे म्हणाले, “आजचा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. न्यायदेवतेला या न्यायासाठी मी दंडवत करतो. आत्तापर्यंत आपण अनेक कथा ऐकत होतो. आता याचा निकाल लागला आहे.” दोघा ठाकरेंनी निर्णयाचे स्वागत केले आहे.


No comments:

Post a Comment