भाजपला शिवसेनेकडून अजूनही आशा आहेत का? - Vaijapur News

Breaking

Saturday, November 16, 2019

भाजपला शिवसेनेकडून अजूनही आशा आहेत का?

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत शिवसेनेने वाटाघाटीच्या चर्चाही सुरू केल्यात. या तिन्ही पक्षांच्या चर्चेची पहिली संयुक्त फेरीही पार पडली.हे एकीकडे सुरू असताना, अजूनही भाजपला सत्तास्थापनेची आशा आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. याला कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वक्तव्यं.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर भाष्य करताना नितीन गडकरींनी म्हटलं, क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं. कधीकधी तुम्ही पराभूत होत आहात असं वाटायला लागतं, पण निर्णय त्याच्या अगदी उलट येतो.

No comments:

Post a Comment