देशातील संपूर्ण राजपूत समाजाने एक संघ होणे काळाची गरज-अ.भा.क्षत्रिय महासभा राष्ट्रीय अध्यक्ष ठा.महेंद्रसिंग तंवर - Vaijapur News

Breaking

Sunday, July 27, 2025

देशातील संपूर्ण राजपूत समाजाने एक संघ होणे काळाची गरज-अ.भा.क्षत्रिय महासभा राष्ट्रीय अध्यक्ष ठा.महेंद्रसिंग तंवर


वैजापूर/नाशिक ता,२८
देशातील   शूरवीर स्वाभिमानी  राजपूत समाजाचा फार मोठा इतिहास आहे,हा इतिहास स्वाभिमानासह टिकवून ठेवायचा असेल व राजपूत संस्कृती व स्वाभिमानी मूल्ये जपायची असतील तर देशातील संपूर्ण राजपूत समाजाने एक संघ होणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन अखिल भारतीय क्षत्रिय महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष ठा.महेंद्रसिंग तंवर यांनी नाशिक येथे या महासभेच्या वतीने देशात  पहिल्यांदाच आयोजित राजपूत समाजातील विधुर,विधवा(वीरांगना)घटस्फोटित, अविवाहित बंधू -भगिनींच्या पुनर्विवाह परिचय संमेलनात रविवार(ता.२७)रोजी केले.नाशिक अखिल भारतीय क्षत्रीय महासभा द्वारे आयोजित या संमेलनाचे आयोजक ठा.राजेंद्रसिंग चौहान यांनी यात पुढाकार घेतला त्यांनी आपल्या प्रास्ताविकात  विशद केले की,राजपूत समाजात विधायक व सकारात्मक बदल आणण्यासाठी,विधुर,विधवा, घटस्फोटीत,व अविवाहितांचे पुन्हा विवाह घडवून आणून समाजातील या उपेक्षिताना ही जीवन जगण्याचा आनंद देणे या साठी"आओ नयी दुनिया बसाए"या 
अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला असे प्रतिपादित
केले.या पुनर्विवाह संमेलनात राज्यातीलच नव्हे तर देशभरातील विधुर,विधवा,अविवाहीत महिला व पुरुष वर्गाने उस्फुर्त प्रतिसाद दिला.राजेंद्रसिंह चौहान यांनी सांगितले की या संमेलनात देशातील व राज्यातील वय
वर्ष २०ते७० पर्यंतच्या सदस्यांनी नाव नोंदणी केलेली आहे.त्यांनी पुढे सांगितले की,या संमेलनासाठी त्यांना
मोठ्या प्रमाणात विरोध झाला पण त्याला न जुमानता
त्यांनी हे संमेलन आयोजित केले.आरंभी हिंदवी सूर्य
महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला सर्वश्री  राष्ट्रीय अध्यक्ष ठा.महेंद्रसिंग तंवर,राष्ट्रीय उपाध्यक्ष व आयोजक ठा.राजेंद्रसिंग चौहान(नाशिक),चंद्रकलाताई
सिसोदिया, जसपालसिंग सिसोदिया(धुळे),धर्मपाल--
सिंग राणा(दिल्ली),डिंपल राणा(लुधियाना),अजयसिंग
सेंगर(अकोला),ऍड,आनंदसिंग बायस(कायदे सल्लागार),ठा, धोंडीरामसिंह राजपूत(वैजापूर),यांनी अभिवादन केले व दीप प्रज्वलन केले.राजपूत समाजा तील  उपेक्षित विधवा,विधुर,घटस्फोटित, व अविवाहित यांच्या जीवनात त्यांना योग्य जोडीदार मिळवून देण्यासाठी व जीवन जगण्यासाठीचा हा अभिनव उपक्रम बद्धल राजेंद्रसिंग चौहान यांचा व राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्रसिंग तंवर यांचा वैजापूर राजपूत समाजाच्या वतीने ठाकूर धोंडीरामसिंग राजपूत यांनी विशेष सत्कार केला.या कार्यक्रमात राजेंद्रसिंग चौहान यांना नाशिक राजपूत समाजाच्या वतीने"राजपूत समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अ,भा, क्षत्रिय महासभेचे महामंत्री सुनीलसिंग परदेशी नाशिक,रामसिग बहुरे नाशिक व धुळे जिल्हा  राजपूत समाजाचे अध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे यांनी सहभाग नोंदवीला. या संमेलनासाठी अकोला येथील क्षत्रिय महासभेच्या वतीने ₹सत्तर हजारांचा धनादेश ही प्रदान करण्यात आला.(फोटो कॅप्शन-महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दीप
प्रज्वलित करतांना महेंद्रसिंग तंवर,राजेंद्रसिंग चौहान,धोंडीरामसिंग राजपूत)

No comments:

Post a Comment