सोशल मिडिया वर उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाही करणार -निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. संदिपान सानप - Vaijapur News

Breaking

Tuesday, September 24, 2019

सोशल मिडिया वर उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाही करणार -निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. संदिपान सानप

 विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु झाल्या नंतर   पंचायत समिती कार्यालयात डॉ. सानप, तहसिलदार विनोद गुंडमवार, मुख्याधिकारी विठ्ठल डाके यांनी विविध विभागांची बैठक घेतली व त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.विधानसभा निवडणुकीत फेसबुक, व्हाट्सप सारख्या सोशल मिडियावरुन उमेदवाराचा प्रचार करुन आचारसंहितेचा भंग करणाऱ्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांनी दिला. उमेदवाराला सोशल मिडियावरुन प्रचार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा तपशिल निवडणुक आयोगाला.सादर करावा लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. वैजापूर विधानसभा मतदारसंघातील ३४६ मतदान केंद्रावर मतदान होणार असुन प्रत्येक केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षासह तीन अधिकारी व पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यासर्व केंद्रावर इव्हीएम व व्हीव्हीपँट यंत्राची व्यवस्था करण्यात येणार असुन क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह मतदानस प्रक्रिया व आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी स्थायी पथक, व्हीडीओ शुटिंग करणारे पथक व भरारी पथक अशी पंधरा पथके कार्यरत राहणार आहेत. मतदारसंघातील ३४६ मतदान केंद्रांपैकी ४५ मतदान केंद्र वैजापूर शहरात आहेत. त्यातील आठ मतदान केंद्र प्रशासकिय दृष्ट्या संवेदनशिल आहेत. मात्र मतदारसंघात एकही मतदान केंद्र असुरक्षित (व्हलनिअरेबल) नसल्याचे डॉ. सानप यांनी सांगितले. क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह अठराशे कर्मचारी व पाचशे पोलिसांचा ताफा नियुक्त करण्यात आला आहे. याशिवाय आणखी ३०० कर्मचारी निवडणुक कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा २८ लाख रुपये आहे. उमेदवाराला सकाळी.सहा ते दहा या वेळेत प्रचार करण्यात येणार असुन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत पक्षाचा बी फॉर्म देता येईल असे त्यांनी सांगितले. अपक्ष उमेदवाराला दहा सुचक आवश्यक आहेत, भरारी पथकांच्या वाहनांना जीपीआरएस बसवण्यात येईल असे ते म्हणाले.

 

No comments:

Post a Comment