छ्त्रपती ग्रुप ने नागपूर -मुंबई हायवे वरील खडयांची केली आरती - Vaijapur News

Breaking

Tuesday, September 17, 2019

छ्त्रपती ग्रुप ने नागपूर -मुंबई हायवे वरील खडयांची केली आरती

नागपूर मुंबई महामार्ग लासुर स्टेशन ते शिर्डी रस्ता अतिशय खराब झाला आसुन त्यासाठी वैजापूर येथील छत्रपती ग्रुपने रस्त्याची अनोखी आरती करून नारळ फोडून आंदोलन केले या रस्त्याने हजारो पर्यटक व साई भक्त शिर्डी लागले जातात मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी या रस्ताकडे दुर्लक्ष केले आहे. वैजापूर येथील गंगापूर फाटा येथे येथे हे आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधले या आंदोलनाची चर्चा तालुकाभर सुरू होती . या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघातात अनेकांचे प्राण गेले असुन काही लोकांना अपंगत्व आले आहे  . या आंदोलनात दिगंबर गायके ,कैलास लांडे ,यॊगेश घायवट ,शांतीलाल कोथळे आदि सहभागी होते 

No comments:

Post a Comment