"विनायकराव पाटील महाविद्यालयामध्ये एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन" - Vaijapur News

Breaking

Wednesday, September 18, 2019

"विनायकराव पाटील महाविद्यालयामध्ये एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन"

       
     मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर व डॉ. भीमराव वाघचौरे गौरव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक  व वैजापूर चे भूमिपुत्र डॉ. भीमराव वाघचौरे यांच्या समग्र साहित्यावर व "भीमराव वाघचौरेः व्यक्ती आणि वाड्.मय" यावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन व त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल त्यांचा "जीवनगौरव पुरस्कार" देऊन गौरव करण्यात येणार आहे. दिनांक २१ सप्टेंबर २०१९ शनिवार रोजी विनायकराव पाटील महाविद्यालययात या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पद्मश्री कविवर्य ना. धों महानोर यांच्या हस्ते डॉ. भीमराव वाघचौरे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मा. आ. श्री सतीश भाऊ चव्हाण साहेब यांच्या हस्ते डॉ.भीमराव वाघचौरे यांच्या "पिंडीवरचे विंचू" या कादंबरीचे व प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते त्यांच्या 'किंजाळकाटे" या कादंबरीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन सत्र वेळ १०:३० ते १२:०० पर्यंत चालेल या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य रा.रं.बोराडे असतील तर उद्घाटक प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले व  बीजभाषक म्हणून प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे यांची उपस्थिती राहील . या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. महेश खरात हे करतील तर महाविद्यालयाविषयीची भूमिका प्राचार्य डॉ. उत्तम पांचाळ मांडतील. या चर्चासत्राचे स्वागताध्यक्ष मा.आ. श्री सतीश भाऊ  चव्हाण हे     असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. आप्पासाहेब पाटील असतील. मा.श्री अॅड.देवदत्त पवार, मा. श्री अॅड. प्रमोद दादा जगताप, मा.श्री अभय पाटील चिकटगावकर मा. श्री माजिद कुरेशी, मा.श्री रावसाहेब जगताप, मा. सौ. आनंदीबाई अन्नदाते, मा.श्री. विजय भाऊ ठोंबरे, मा, श्री. काशिनाथ गायकवाड, मा. श्री. दिलीप भाऊ बोरणारे, मा. श्री रिखबचंद पाटणी, मा. श्री डॉ. निलेश भाटीया, मा.श्री. सुनील पैठणपगारे यांची उपस्थिती राहील.
    या चर्चासत्रासाठी वैजापूर शहरातील मा. श्री. दिनेश भाऊ परदेशी मा.नगराध्यक्ष, मा. श्री. आर.एम. वाणी साहेब मा. आमदार, मा. श्री. रमेश बोरणारे सर जि. प. सदस्य औ.बाद, मा. श्री. विशाल संचेती चेअरमन मर्चट बॅंक वैजापूर, मा. श्री. बाळासाहेब संचेती, मा. श्री. जे. के जाधव, मा.श्री. दशरथ बनकर, मा. श्री. डॉ. सुभाष भोपळे, मा. श्री डॉ.राजीव डोंगरे, मा. श्री. हरेष पालेजा हे या चर्चासत्रासाठी उपस्थित राहणार आहेत शिवाय यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. विनायकराव पाटील महाविद्यालयामध्ये होणाऱ्या या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात साहित्यप्रेमींनी व भीमराव वाघचौरे यांच्या साहित्य वाचकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान संयोजन समितीचे प्रमुख प्राचार्य डॉ. उत्तम पांचाळ व गौरव समिती प्रमुख डॉ. महेश खरात व इतर सदस्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment