हिंदू धर्मात अक्षय तृतीया सणाला खूप महत्त्व आहे साडे तीन मुहूर्त पैंकी एक मुहूर्त म्हणून या सणाला महत्त्व आहे. या दिवशी सोने खरेदी किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. यादिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. कारण या दिवशी सोने खरेदी केले तर वर्ष भर कुबेर देवता प्रसन्न राहते अशी मान्यता आहे .परंतु या वर्षी अक्षय तृतीया या सणावर कोरोना चे पूर्ण पणे सावट आहे कोरोना मुळे पूर्ण देशात लॉक डाऊन आहे. जिवन आवश्यक वस्तू शिवाय कुठलीही दुकान चालू नाही. देशाची आर्थिक बाजारपेठ पूर्ण पणे बंद आहे.या दिवशी प्रत्येक घरात आमरस चा मेनु असतो कोरोना मुळे सगळीकडे लॉक डाऊन आहे त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात आंब्याची आवक ही वैजापूर च्या बाजारात झालेली नाही.परंतु आज अक्षय तृतीया असल्याने आज आंब्याची मागणी प्रचंड वाढली व पुरवठा कमी असल्यामुळे आंब्याच्या दर 300रुपये किलोच्या वर गेला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment