
*घाटीत नवीन दोन कोरोना पॉझिटिव्ह*
औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : घाटीत रात्री नवीन दोन महिला रुग्णांचा कोविड पॉझिटिव्ह अहवाल आला. दौलताबादच्या बस स्टॉप, छोटी मंडी येथील 53 वर्षीय आणि औरंगाबाद शहरातील असेफिया कॉलनीतील 39 वर्षीय या त्या महिला रुग्ण आहेत. त्यांना 25 रोजी घाटीत भरती करण्यात आले होते, असे घाटीचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
*एकूण 26 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू*
सध्या घाटीत एकूण सहा कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर मिनी घाटीत 20 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे एकूण 26 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 22 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 05 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत 53 कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळले आहेत.
No comments:
Post a Comment