वैजापूर - पूर्ण जगात हाहाकार घातलेल्या कोरोना मुळे राज्यासह देशात लॉक डाऊन आहे. जनतेची आर्थिक उलाढाल पूर्ण पणे ठप्प आहे. या प्रसंगी विविध संघटना ,सामाजिक कार्यकर्ते आप आपल्या पद्धतीने गरजूंना मदत करण्यासाठी पुढे येत आहे. असेच चित्र वैजापूर येथील पारसोडा गावात बघावयास मिळाले .वैजापूर पंचायत समितीच्या सभापती सीना मानाजी मिसाळ यांनी गरजू लोकांना आपल्या वतीने अन्न धान्य, तांदूळ, तेल सारख्या जिवन आवश्यक वस्तू चे वाटप आमदार अंबादास दानवे, आमदार रमेश बोरणारे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मानाजी मिसाळ, डॉ. दिनेश परदेशी, साबेर खान, तहसीलदार महेंद्र गिरगे, गट विकास अधिकारी अजय सिंग पवार, बाबा साहेब जगताप, भाऊसाहेब गलांडे, बद्री चव्हाण, रामभाऊ धोत्रे, राजू छानवाल,ग्रामसेवक पप्पू मरमेठ आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment