*औरंगाबादेत आतापर्यंत 28 कोरोना रुग्ण, 24 वर उपचार सुरु. - Vaijapur News

Breaking

Thursday, April 16, 2020

*औरंगाबादेत आतापर्यंत 28 कोरोना रुग्ण, 24 वर उपचार सुरु.

*औरंगाबादेत आतापर्यंत 28 कोरोना रुग्ण, 24 वर उपचार सुरु* 
औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका) : कोविड 19 (कोरोना) संसर्गामुळे औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 28 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) 22, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (घाटी) एक आणि खासगी रुग्णालयात एक  अशा एकूण 24 कोरोनाबाधित रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.  
 जिल्हा सामन्य रुग्णालयात (मिनी घाटी) दाखल रुग्णांपैकी दोघा जणांचा अहवाल कोविड 19 विषाणूचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याचे मिनी घाटीचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. तर घाटीत प्रकृती गंभीर असलेल्या  65 वर्षीय महिला रुग्णाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णास मधुमेह, रक्तदाब, किडनीचा आजारही आहे, असे घाटीचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
घाटीतून मिनी घाटीस 13 जणांचे कोविड (कोरोना) तपासणी अहवाल प्राप्त झालेत. या अहवालामध्ये चौदा दिवस पूर्ण करणाऱ्या एका अन्य रुग्णाचा देखील समावेश आहे. त्या व्यक्तीचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या रुग्णावर मिनी घाटीत उपचार सुरूच राहतील.  मिनी घाटीत आज 72 रुग्णांची तपासणी झाली. त्यापैकी 17 जणांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. 52 जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले आहेत. घाटीकडून मिनी घाटीस आज प्राप्त झालेल्या अहवालांपैकी उर्वरित 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. मिनी घाटीत 22 कोरोनाबाधित रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू असल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाले.
तर घाटीत 15 कोविड संशयित रुग्ण, 10 कोविड निगेटिव्ह व एक पॉझिटिव्ह असे एकूण 26 रुग्ण भरती आहेत. आज घाटीत 36 जणांची तपासणी करण्यात आली, त्यात तीन नवीन कोविड संशयित रुग्ण भरती झाले आहेत, असे डॉ. गायकवाड म्हणाले.
*****

No comments:

Post a Comment