कोरोनो या घातक विषाणूला रोखण्यासाठी वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे विविध पध्दतीने उपाययोजना केल्या जात आहे. या कामात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,पोलिस कर्मचारी, आरोग्य सेवक, आदी पूर्ण पणे कार्यरत आहे.कोरोनो या घातक विषाणूला रोखण्यासाठी गावातील नागरिकांनी कंबर कसली आहे. औरंगाबाद येथील लायन्स कलब आयकॉन चे अध्यक्ष अजय पाटील चिकटगावकर यांच्या माध्यमातून मास्क ,सँनिटायझर चे वाटप करण्यात आले.या प्रसंगी उप सभापती राजेंद्र मगर, सरपंच नितीन चुडीवाल, मा. सरपंच चंद्रशेखर खांडगावरे, रिखब पाटणी, उत्तम निकम, संदीप पवार,कृष्णा जाधव, संकेत चुडीवाल, बाळू पवार आदी गावकरी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment