औरंगाबाद शहरात कोरोनाचा दुसरा बळी - Vaijapur News

Breaking

Tuesday, April 14, 2020

औरंगाबाद शहरात कोरोनाचा दुसरा बळी

*आरेफ कॉलनीतील 68 वर्षीय कोरोनाबाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू* 
औरंगाबाद, दिनांक 14 (जिमाका) :  कोरोनाबाधित 68 वर्षीय रूग्णाचा आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) येथे उपचारा दरम्यान आज दुपारी 1.14 वाजता मृत्यू झाला. हा रूग्ण औरंगाबाद शहरातील आरेफ कॉलनीतील रहिवासी आहे.  जिल्हा सामान्य रूग्णालय (मिनी घाटी)तून 08 एप्रिल रोजी या रुग्णास पुढील उपचारासाठी घाटीत हलविले होते.
ताप, खोकला आणि घसा खवखवण्याचा त्रास 03 एप्रिलपासून या रूग्णास होत होता. त्यावर घाटीत उपचार सुरू होते. परंतु प्रकृती खालावल्याने 08 एप्रिल रोजी त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली.  09 एप्रिल रोजी त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल निगेटीव्ह आला. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने 11 एप्रिल रोजी त्यांची परत दुस-यांदा कोरोना तपासणी करण्यात आली. 13 एप्रिल रोजी त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रकृती खालावल्याने 11 एप्रिलपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या रूग्णास किडनी व श्वसन संस्थेशी निगडीत आजारही होते, अशी माहिती घाटी प्रशासनाच्यावतीने अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
*****--

No comments:

Post a Comment