सारी चा प्रादुर्भाव रोखण्यसाठी औरंगाबाद मध्ये 13 तपासणी केंद्र - Vaijapur News

Breaking

Tuesday, April 14, 2020

सारी चा प्रादुर्भाव रोखण्यसाठी औरंगाबाद मध्ये 13 तपासणी केंद्र

*सारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी* 
 *औरंगाबादेत १३ ठिकाणी ताप* *तपासणी केंद्रे सुरू* 
                      
        *पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर महापालिका सज्ज* 
        
औरंगाबाद, दि. १४ (जि माका)  कोरोना , सारी तसेच इतर विषाणूजन्य आजारांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या निर्देशानंतर महानगरपालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. विशेषतः सारीसाठी १३ ठिकाणी ताप तपासणी केंद्र स्थापन केले आहेत.  
  औरंगाबादमध्ये कोरोना तसेच सारीचा प्रभाव वाढत असून त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना पालमकंत्री सुभाष देसाई यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आय़ुक्त यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे दिल्या होत्या. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे (कोविड -१९) कोरोना संशयित व कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एकूण चार गटात याची वर्गवारी करण्यात आली आहे.
१. शहरात एकूण १३ ठिकाणी ताप तपासणी केंद्र (Covid Fever Clinic ) सुरू करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सौम्य आजार असलेल्या कोरोना सदृश्य रुग्णांची तपासणी करण्यात येईल. गरज भासल्यास अशा रुग्णांना कोविड केअर सेंटर (CCC)येथे भरती केले जाईल. 
ताप उपचार केंद्र पुढील प्रमाणे.
१.समाजकल्याण हॉस्टेल, किलेआर्क २.एम.जी.एम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स एन -६ ३.इ ओ सी, अग्निशमन दल पदमपुरा
४.एमआयटी इंजिनिअरनिंग कॉलेज हॉस्टेल, बीड बायपास रोड ५.आय एम ए मिनी हॉल, शनी मंदिर समर्थनगर
६.आय एम ए कम्युनिटी सेंटर एन -२  , 
७.मनपा शाळा, गारखेडा  ८.मनपा शाळा, भडकलं गेट 
९.मनपा शॉपिंग सेंटर, टीव्ही सेंटर चौक
१०.मनपा शाळा कांचनवाडी ११. एम.जी.एम कॉलेज अँड हॉस्पिटल, एन -६ 
१२.धूत हॉस्पिटल, जालना रॊड .
१३. देवगिरी महाविद्यालयाचे मुलांचे व मुलींचे वसतिगृह. 
वरील १३ ठिकाणी ताप उपचार केंद्र सुरू करण्यात आले असून या ठिकाणी डॉक्टर, नर्स यांच्यासह २५०० खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सर्व ठिकाणी जेवण आणि इतर आवश्यक सुविधा औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
२).मध्यम आजार उपचार केंद्र (DCHC –Dedicated Covid Health Center ) –
१- सिव्हिल हॉस्पिटल (मिनी घाटी ) चिकलठाणा- खाटांची संख्या २२० आहे.
३.तीव्र आजार उपचार केंद्र (DCH –Dedicated Covid Hospital ) -१  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी )  खाटांची संख्या ४५० आहे.
४. तसेच जे हॉस्पिटल कोविड सुविधेसाठी निश्चित करण्यात आलेले नाहीत अशा सर्व हॉस्पिटल्स मध्ये कोविड -१९ च्या रुग्ण व्यतिरिक्त इतर सर्व आजारांसाठी उपचार करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत.
तसेच कोरोना संशयित रुग्णांसाठी कलाग्राम, चिकलठाणा एमआयडीसी येथे कोरोनटाईन वार्ड तयार करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सर्व अत्यावश्यक सुविधा व मनोरंजनासाठी कॅरम, बुद्धीबळ या सारखे खेळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे शहरात ९ झोन मधील एकूण २२  शाळेत स्थलांतरित मजूर , यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 
१.मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा एन-७ येथे ५६,  
२. मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा एन-६ येथे ५६
३.मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा जवाहर कॉलनी येथे-२७
 या तीन ठिकाणी एकूण १३९ स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
शहरात सर्व ९ झोन मध्ये जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आलेली आहे. 
        महानगरपालिकेतर्फे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विलगीकरण कक्षाकरिता व इतर रोगाच्या काम संदर्भात ठराविक वेतनावर कंत्राटी पद्धतीवर ३ डॉक्टर नियुक्त करण्यात आलेले आहेत. कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी सामाजिक अंतर ठेवणे साठी व गर्दी वर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात सर्व ९ झोन मध्ये एकूण ४० निर्धारित केलेल्या ठिकाणी भाजी मंडई व फळे विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
           तसेच शहरात सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत मागील दोन दिवसात एकूण १७७ विना मास्क फिरणारे नागरिक यांचे कडून एकूण ८९,५००/- रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. औरंगाबाद महानगरपालिका व औरंगाबाद फर्स्ट या स्वयंसेवी संस्थे मार्फत नागरिकांना किराणा , भाजीपाला ,फळे व औषधी अश्या अत्यावश्यक सामग्रीची ऑन लाईन ऑर्डर घेऊन या तत्वावर  घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.सदर घरपोच सेवा ही सशुल्क असणार आहे.www.emergency-needs.com ,व 9654535041 या हेल्प लाईन नंबरवर संपर्क करून नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
 मनपा हद्दीत कोरोना विषाणू संसर्ग झालेले व संशयित सामान्य नागरिकांपासून वेगळे ठेवण्यासाठी शहरात एकूण ५ ठिकाणी अलगीकरण /विलगीकरण  अथवा निवारागृह उभारण्यात आलेले आहेत.या ठिकाणी मनपा तर्फे सर्व अत्यावश्यक सुविधा जसे की विदुत व्यवस्था ,पंखे ,सीसीटीव्ही कॅमेरे ,सर्व ठिकाणी मनोरंजनाची साधने उदा.कॅरमबोर्ड ,बुद्धिबळपट .इ सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.
 कोविड -१९ बाबत नागरिकांच्या मदतीसाठी मनपा मुख्यालय येथे २४ तास कोरोना उपाय योजना नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे.या साठी हेल्पलाइन नंबर 8956306007 या क्रमांकावर नागरिक संपर्क करू शकतात.

No comments:

Post a Comment