*मिनी घाटीत नवीन तीन कोरोनाबाधित संशयित रूग्ण*
औरंगाबाद, दिनांक 03 (जिमाका) : जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये (मिनी घाटी) नव्याने तीन कोरोनाबाधित संशयित रूग्ण आज भरती झाले आहेत, असे रूग्णालयाच्यावतीने डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
गुरूवार, दि. 02 रोजीचे सायंकाळी दाखल रूग्ण व आज दाखल अशा एकूण 34 रुग्णांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी शासकीय रूग्णालय व महाविद्यालय (घाटी) येथे पाठविलेले आहेत. त्यापैकी 4 जाणांचे अहवाल प्राप्त असून ते निगेटिव्ह आहेत. येथून एकूण 30 लाळेच्या नमुन्यांचे अहवाल येण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
***
No comments:
Post a Comment