आपत्कालीन परिस्थितीत इच्छुकांचा डेटाबेस ; माहिती भरण्याचे प्रशासनाचे आवाहन - Vaijapur News

Breaking

Saturday, April 4, 2020

आपत्कालीन परिस्थितीत इच्छुकांचा डेटाबेस ; माहिती भरण्याचे प्रशासनाचे आवाहन



औरंगाबाद, दिनांक 04 (जिमाका) कोविड 19 साथीचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक यांची मोठ्याप्रमाणात गरज भासणार आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत इच्छुकांचा डेटाबेस तयार करण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयात कोविड 19 नियंत्रण कक्षाने गुगल फॉर्म प्रसिद्ध केला आहे. त्याची लिंक https://forms.gle/vFkduqXpMfYCqy85A अशी आहे. इच्छुकांनी या लिंकचा वापर करून माहिती भरावी.
आरोग्य डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, स्वयंसेवी संस्था यांचे सदस्य, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशनचे सदस्य, सेवानिवृत्त डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ, आरोग्य सहायक, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, सेवानिवृत्त नर्सिंग स्टाफ, आरोग्य सहायक, होमगार्ड, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी यापैकी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास उत्सुक आहेत, ज्यांची सेवा आपत्कालीन परिस्थितीत घेऊ शकतात, अशांनी लिंकवर जाऊन माहिती भरावी, असे आवाहन उप जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी केले आहे.
******

No comments:

Post a Comment