शालेय व महाविद्यालयीन आठवणीना उजाळा देत ३५वर्षानंतर वर्ग मित्रांचा वर्ग भरला वैजापूरात - Vaijapur News

Breaking

Wednesday, May 21, 2025

शालेय व महाविद्यालयीन आठवणीना उजाळा देत ३५वर्षानंतर वर्ग मित्रांचा वर्ग भरला वैजापूरात


वैजापूर ता,२१
येथील विनायकराव पाटील महाविद्यालयातील १९९१च्या शैक्षणिक  वर्षात  शिकत असलेले वर्ग मित्र/मैत्रिणी तब्बल ३५वर्षा नंतर बुधवार(ता,२१)रोजी वैजापूर येथे मातोश्री हॉटेल मध्ये शालेय व महाविद्यालयीन जीवनातील गोड अनुभव,गोड आठवणी,मौज-मजा व त्या वयातील काही अविस्मरणीय क्षण आठवत गाणीगात, आयुष्यातील आनंदी क्षण शेअर करीत पांच तास रमले.त्यांना इंग्रजी विषय शिकविणारे सेवा निवृत्त शिक्षक धोंडीरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत हा स्नेह मेळावा अतिशय आनंद,स्नेह,व उत्साहात आपल्या जीवनाची आजपर्यंतची यशोगाथा व्यक्त करीत हा स्नेह मेळावा सम्पन्न झाला.या कार्यक्रमासाठी शिक्षक सुनील साळुंके ,संजय गायकवाड,वेणूगोपाल नेमाने ,विजय कुमार दायमा,कल्याण पा,जगताप यांनी पुढाकार घेतला. सुरुची भोजनाचा आस्वाद,चित्रपट गीते, जीवनातील आनंददायी क्षण,कटू प्रसंग, व आपल्या परिवाराची यशोगाथा या स्नेहीनी कथन केली.आतापर्यंत जीवनात आलेले क्षण ही त्यांनी शेअर केले.मुंबई,छत्रपती संभाजीनगर, पुणे,नाशिक,बुलढाणा,धुळे,जळगाव नागपूर ,जालना,लातूर,येवला, कोपरगाव अशा  विविध 
ठीकाणी नौकरी,व्यवसाय निमित्त कार्यरत साठ वर्ग मित्र यांचा हा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला.आयोजक सुनील साळुंके यांनी प्रास्ताविक केले.प्रथम दिवंगत वर्ग मित्र व भारतीय शहीद, दिवंगत पर्यटक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुरज राजपूत, चंद्रकांत गायकवाड, प्रशांत सोनटक्के,सर्वश्री पोंदे,कुलकर्णी, जोशी,अनर्थे,दायमा,
यांनी पुढाकार घेतला ,रीनारॉय  बोरसे,केशर उगले,सुशील चांदकर(थोरात),लता सोनवणे, कल्पना उगले,सविता रिंढे, आरती जोशी( मुंबई),छाया जगताप ,सरिता जाधव, श्रीमती वैशाली, श्रीमती औताडे,श्रीमती शेजवळ याशिवाय महाराष्ट्रच्या विविध
भागात असलेले वर्ग मित्र व मैत्रिणी यांनी या मेळाव्यात उपस्थिती दर्शविली.

No comments:

Post a Comment