वैजापूर येथे गुरुवार(ता,२२)रोजी "भारतीय सैन्य शौर्य सन्मानार्थ तिरंगा फेरी" - Vaijapur News

Breaking

Tuesday, May 20, 2025

वैजापूर येथे गुरुवार(ता,२२)रोजी "भारतीय सैन्य शौर्य सन्मानार्थ तिरंगा फेरी"


वैजापूर ता,२०
 भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दाखविलेल्या अतुलनीय शौर्य व पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी तसेच  जवानांच्या सन्मानार्थ गुरुवार(ता.२२) रोजी संपूर्ण शहर व तालुका वासीयांच्या वतीने "भारत शौर्य तिरंगा फेरी" चे(यात्रा)शहरात आयोजन करण्यात आलेले आहे. गुरुवार(ता,२२)रोजी ही फेरी सकाळी ९-००वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथुन आरंभ होणार आहे व विसर्जन पंचायत समिती समोर होणार आहे.या भारत तिरंगा फेरीत आजी-माजी सैनिक,एन.सी.छात्र,शहरातील चारही जेष्ठ नागरिक संघाचे सर्व जेष्ठ नागरिक,समाज कार्यकर्ते, शहरातील सर्व स्तरावरील संस्था,मंडळे,सर्व पक्ष प्रतिनिधी सर्व लोकप्रतिनिधी, ,संप्रदाय सर्व महिला ग्रूप,शालेय विद्यार्थी, शिक्षक,जिमचे सर्व युवक-युवती सहभागी होणार आहेत.भारतीय सैन्याच्या शौर्य व सन्मानार्थ त्यांना मानवंदना म्हणून ही फेरी असणार आहे.या "भारत शौर्य तिरंगा फेरी"त शहर व तालुक्यातील सर्व थरातील बंधू-भगिनी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंगळवार(ता,२०)रोजी
या फेरी साठी आयोजित बैठकीत करण्यात आले .

  

No comments:

Post a Comment