वैजापूर ता.१९
वैजापूर आगारा साठी नवीन पंचवीस बसेस पैकी पहिल्या पांच बसेस या डेपोला उपलब्ध झाल्या आहेत ,उर्वरित वीस बसेस ही मार्ग परिवहन महामंडळ कडून लवकरच उपलब्ध होणार आहेत असे प्रतिपादन वैजापूर चे आमदार प्रा.रमेश. पा.बोरनारे यांनी मिळालेल्या पांच नवीन बसेसच्या लोकार्पण सोहळ्यात रविवार(ता,१८) रोजी बस स्थानकात आयोजित कार्यक्रमात केले.ते पुढे म्हणाले की ,आमदार निधीतून बस स्थानकावर प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून अडीच कोटी रूपये निधी उपलब्ध करून दिले आहे. पिण्याचे पाणी,आसन व्यवस्था, शौचालय व्यवस्था,चारही बाजूला कंपाउंड,सांडपाणी व्यवस्था ,सी सी टी, व्ही कॅमेरे बसवने,अशा सर्व सोयी यातून
उपलब्ध होत आहेत. शिवूर बस स्थानकास ही चार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत त्याचे काम
प्रगती पथावर आहे.प्रास्तविक आगार प्रमुख किरण धनवटे यांनी केले,सूत्र संचलन प्रवाशी संघटनेचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिह राजपूत यांनी केले.तर आभार स्थानक प्रमुख एस, गरुड यांनी मानले.प्रवाशी महिला वंदना पवार यानी आपले विचार मांडले.आरंभी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी पुतळ्याला अभिवादन करून या पांच ही बसेस वाजत गाजत बस स्थानक येथे आणण्यात आल्या.डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला ही अभिवादन करण्यात आले.बस स्थानकात महिला, व प्रवाशी लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते बसेस च्या दाराची फित सोडून बसेस लोकार्पण सोहळा झाला. या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप,उपनगराध्यक्ष साबेरखान, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पा, साळुंके, शहर प्रमुख पारस घाटे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामहरी जाधव,डॉ,राजीव डोंगरे, डॉ,निलेश भाटिया,भाजपा तालुका अध्यUक्ष नारायण कवडे. राष्ट्रवादी चे अशोक देवकर,युवा सेनेचे श्रीराम गायकवाड, ज्ञानेश्वर जगताप, ज्ञानेश्वर टेके,संजय बोरनारे,अमोल बोरनारे,महिला आघाडीच्या
सुलभाताई भोपळे, नगर सेविका,सुप्रिया व्यवहारे,वर्षा
बोरनारे,सुनीता साखरे,अनिता दाणे,श्रीमती पुणेताई,
डॉ,संतोष गंगवाल,गोकुळ भुजबळ,स्वप्नील जेजुरकर,बाबा पुतळे,प्रदीप साळुंके,आमीरअली,हमीद
कुरेशी,अमोल बावचे,प्रकाश मतसागर, वसंत त्रिभुवन, बबन त्रिभुवन, संदीप ठोंबरे,शंकर मुळे, रामकीसन जोरे,मोती वाघ यांच्या सह बस डेपोचे श्री,गरुड,आदिनाथ मुळे, भगवान गिरी,श्री.तुपे,श्री साळुंके,केतन आहेर,कांतू गुंजाळ,श्री.जाधव,यांच्यासह
मंडळाचे चालक व वाहक प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(फोटो कॅप्शन आ,बोरनारे, बाबा साहेब जगताप,धोंडीराम ठाकूर, निलेश भाटिया,राजेंद्र साळुंकेव इतर
No comments:
Post a Comment