देशातील १५ कोटी जेष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या २०२५ च्या अर्थसंकल्पात विविध सुविधा/सवलती - Vaijapur News

Breaking

Sunday, April 20, 2025

देशातील १५ कोटी जेष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या २०२५ च्या अर्थसंकल्पात विविध सुविधा/सवलती

 
वैजापूर ता,२१
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५ -२०२६ च्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प मध्ये देशातील १५कोटी पेक्षा अधिक असलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी विविध सुविधा अंतर्भूत केल्या आहेत यांचा लाभ देशातील जेष्ठ नागरिकांनी घेऊन आपली वयाची उतरती संध्याकाळ निरोगी,आनंददायी,व सुखी ,समाधानी घालवावी असे आवाहन वैजीनाथ जेष्ठ नागरिक सेवा संघाचे सचिव धोंडीरामसिंह राजपूत यांनी  रविवार(ता,२०)रोजी आयोजित मौलाना आझाद शाळेतील जेष्ठ नागरिकांच्या वयाची ७५ही पूर्ण केलेल्या बबनराव क्षीरसागर व सुभाषचंद्र बोरा याच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात केले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी संघाचे जेष्ठत्तम सदस्य  प्रकाश शेठ बोथरा होते.तर जेष्ठत्तम नागरिक गोपालदास आसर, बबनराव डोंगरे,उत्तमराव साळुंके, रवींद्रआप्पा साखरे यांची  व्यासपीठावर उपस्थिती होती.केंद्र सरकारने देशातील जेष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात --पांच सुविधा१)-- ६० वर्ष वयापेक्षा जास्त वय  असलेल्या पुरुषांना रेल्वे मध्ये प्रवासासाठी ४०टक्के सवलत,आणि महिलांना ५०टक्के सवलत२)देशातील ७०वर्ष वयावरील सर्व जेष्ठ नागरिकांना आयुष्यामान आरोग्य कार्डवर शासकीय व शासनाच्या अधीन चालणाऱ्या रुग्णालयात मोफत उपचार३)ज्या जेष्ठ नागरिकांचे बँकेत फिक्सड डिपॉजिट असेल त्यावरील एक लक्ष रुपयांपर्यंत व्याजवर कोणताही कर नाही४)दारिद्रय रेषेखालील जेष्ठ नागरिकाना सामाजिक सुरक्षा पेंशन योजना५) केंद्र सरकारच्या २००७च्या कायद्यानुसार देशातील सर्व जेष्ठ नागरिकांना मोफत कायदे सल्ला
तसेच त्यांच्या मुलं-बाळानी पालन पोषण जबाबदारी 
नाकारली तर या कायद्या: नाकारली तर या कायद्यातील तरतुदी नुसार जेष्ठ-नागरिकांना न्यायालयीन दाद मागता येईल.या पांचही सुविधाची माहिती राजपूत यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांना देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी शहरातील बहुसंख्य जेष्ठ नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी जेष्ठ नागरिक यांना शाल व गुलाब पुष्प देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.उत्तमराव साळुंके यांनी साने गुरुजींची प्रार्थना-खरा तो एकची धर्म सादर केली.सूत्र संचलन एस. एस. डोंगरे यांनी केले,आभार भगवान सिंह राजपूत यांनी मानले.कोषाध्यक्ष सुरेश संत,मुकुंद शेठ दाभाडे,सुभाष बोहरा ,  सेवा निवृत्त पोलीस अधिकारी सोपानराव निकमआर,पी,क्षीरसागर,सुदाम गोंधळे, राजेंद्र संचेती,कृष्णा कांबळे, सुभाष चाफेकर,सुभाष आंबेकर यांनी  सहभाग नोंदविला(फोटो कॅप्शन-वैजापूर जेष्ठ नागरिक सेवा संघ बैठकित जेष्ठ नागरिक).

No comments:

Post a Comment