भारतीय जवानांच्या सन्मानार्थ व गौरवार्थ वैजापूरात भव्य तिरंगा यात्रा(फेरी) - Vaijapur News

Breaking

Thursday, May 22, 2025

भारतीय जवानांच्या सन्मानार्थ व गौरवार्थ वैजापूरात भव्य तिरंगा यात्रा(फेरी)

 
वैजापूर ता,२२
"भारतीय सैनिकांच्या शौर्याचा -विजय असो," भारत माताकी जय,"वंदे मातरम",भारतीय सैनिकांचा-विजय असो"देशका रक्षक कैसा हो-भारतकी सेना जैसा हो",
अमर रहे-अमर रहे -वीर जवान अमर रहे".अशा घोषणा नी वैजापूर शहर दणाणून सोडत व चाऊस ब्रास बँड यांच्या भक्तीपर गीतांनी जोशपूर्ण वातावरणात शहर व तालुक्यातील सर्व थरावरील विविध पक्ष पदाधिकारी,आजी- माजी,सैनिक,एन. सी.सी. छात्र, जेष्ठ नागरिक,समाजकार्यकर्ते, महिला
मंडळ, पत्रकार, लोकप्रतिनिधी यांनी गुरुवार(ता,२२)रोजी "शहराच्या मध्यवर्ती भागातून"तिरंगा फेरी"(यात्रा)काढून  भारतीय सैनिकांनी"ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत दाखविलेल्या शौर्याचा  गुण गौरव केला.या रॅलीच्या माध्यमातून भारतीय सैनिकांचे मनोबल उंचवावे व देश त्यांच्या पाठीशी आहे, हेही सर्व वैजापूरवासी व तालुका वासी यांनी आपल्या एकजुटीतून दाखवून दिले.ही रॅली भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ सर्व स्तरातील नागरिक यांनी काढली, तसेच या "तिरंगा यात्रेतून" पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप पर्यटक ,व ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेल्या जवानाना आदरांजली ही वाहण्यात आली.एक तास देशासाठी, एक तास भारत मातेसाठी,एक तास भारतीय जवानांसाठी या आयोजकांच्या आवाहनाला
शहर व तालुक्यातील नागरिकांनी भर -भरून प्रतिसाद दिला .
जुन्या बस स्थानकापासून ही "तिरंगा यात्रा"आरंभ झाली.डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आ,प्रा,रमेश. पा.बोरनारे,डॉ,दिनेश परदेशी,नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, जयमाला वाघ,कल्पना पवार,उपनगराध्यक्ष साबेरखान,  रामहरी बापू जाधव,विशाल संचेती,नारायण कवडे, प्रशांत कंगले,दिनेश राजपूत आयोजक ,दशरथ बनकर, संदीप ठोंबरे यांनी नियोजन केले .राजेंद्र.पा.साळुंके, पारस घाटे,अशोक देवकर, सचिन वाणी, अशोक देवकर ,अखिल शेख,मजीद  कुरेशी,यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.व "तिरंगा फेरी"ला आरंभ झाला.माजी सैनिक सर्वश्री संदीपजगधने,ऍड,धरमसिंग राजपूत,गुलाबराव पवार,गौतम गायकवाड, शिवनाथ 
राहणे,सध्या सीमेवर कार्यरत आजी सैनिक अण्णासाहेब बेद्धे,  श्री,आलमगीर ,डुकरे,शिवनाथ राहणे, पोपट थोरात ,श्रीमती आरती थोरात यांनाच सन्मानाने व्यास व्यासपीठावर बसविलें, व त्यांच्यासह सर्वच उपस्थित आजी -माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला. तिन्ही दलाच्या माजी सैनिक प्रमुखांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार टाकुन अभिवादन केले.पंचायत समिती प्रांगणात समारोप प्रसंगी शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले.आजी-माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन मान्यवर उपस्थितांनी त्यांचा सत्कार केला,माजी सैनिक ऍड धरमसिंग राजपूत व आजी सैनिक अण्णा साहेब बेधे यांनी मनोगत व्यक्त केले.सेवानिवृत्त प्राध्यापक जवाहर कोठारी यांनी ही मनोगत व्यक्त केले,आयोजक दशरथ बनकर,संदीप ठोंबरे,ज्ञानेश्वर आदमाने यांनी संयुक्तिक आभार मानले.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.ही "तिरंगा फेरी" (यात्रा) यशस्वी करण्यासाठी डॉ,दिनेश परदेशी, दशरथ बनकर,दिनेश राजपूत,प्रेम राजपूत,गोकुळ भुजबळ, गौरव दौडे,राजेश गायकवाड, महेंद्र काटकर,गिरीश चापानेरकर, शैलेश पोंदे,दुर्गा राजपूत, अनिता तांबे,स्वाती देशमुख, अनिता दाणे,संतोषी-- लालसरे,वर्षा बोरनारे,अमोल बोरनारे,महेश बुणगे,अशोक आप्पा पवार(खंडाळकर)बापू गावडे,बाबासाहेब बहिरट,,संजय बोरनारे,शरद जुंधारे
यांच्या शहरातील जेष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते, महिला वर्ग,पत्रकार, मेडिया वर्ग,शहर व तालुक्यातील  सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी सहभाग नोंदविला. सूत्र संचलन धोंडीरामसिंह ठाकूर यांनी केले.आभार संदीप ठोंबरे यांनी मानले( फोटो कॅप्शन-वैजापूर तिरंगा फेरी-यात्रेत सहभागी आ.बोरनारे,डॉ,दिनेश परदेशी, दशरथ बनकर, साबेरखान,सचिन वाणी,अशोक देवकर)
 

No comments:

Post a Comment