वैजापूरात श्री. शिव महापुराण कथा नियोजन साठीशहर व व गावकऱ्यांची बैठक - Vaijapur News

Breaking

Tuesday, May 27, 2025

वैजापूरात श्री. शिव महापुराण कथा नियोजन साठीशहर व व गावकऱ्यांची बैठक

 
वैजापूर ता,२८
पुढील महिन्यात वैजापूर येथे आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भूषण शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांची शिवमहापुराण कथा होणार आहे.येथील श्री.साईभक्त बहुउद्धेशिय सेवाभावी संस्थेच्या  वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे,त्याच्या  सूत्रबद्ध नियोजनासाठी शहरातील सर्व थरातील नागरिक, सेवेकरी, मंडळे,महिला मंडळे, ग्रामीण भागातील नागरिक सेवेकरी यांची सूरज लाँन   येथे मंगळवार(ता,२७)रोजी  सायंकाळी बैठक घेण्यात आली. कार्यक्रम शहरातील जेष्ठतम नागरिक डॉ,व्हि.जी,शिंदे,झुंबरलाल शर्मा, प्रकाश शेठ बोथरा,रविंद्र आप्पा साखरे,धोंडीरामसिंह राजपूत,काशिनाथ शेठ गायकवाड, काशिनाथ भावसार, गोविंद दाभाडे,सौ. संध्याताई ठोंबरे,सौ. अंजली  ताई जोशी,शिल्पाताई परदेशी,जयमाला वाघ,सौ,सुनीता संचेती ,अशोक धसे  यांच्या उपस्थितीत घेण्यात आली ,या प्रसंगी डॉ,दिनेश परदेशी,बाळासाहेब संचेती, अकिल शेख यांची ही उपस्थिती होती. प्रास्ताविक व सूत्र संचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले.तर कार्यक्रम नियोजन आयोजक विशाल शेठ संचेती यांनी सर्वांसमोर सादर केले.अंजली जोशी,भिमाशंकर
साखरे,शुभांगी राजपूत, संतोषी भालेराव,यांनी विधायक सूचना केल्या. सदरील कथा नागपूर-मुंबई
महामार्ग  च्या कडेला असलेल्या १७६व्या अखंड हरिनाम सप्ताह झालेल्या जागी होणार आहे. एक लक्ष भक्त भाविक बसतील असा वॉटर प्रूफ मंडप त्या ठिकाणी असणार आहे.भक्त भाविकांच्या निवासासाठी  या महामार्ग लगत असलेल्या पांच भव्य
लाँन बुक करण्यात आलेल्या आहेत.१जून,रविवार रोजी स्तंभ पूजन /भूमिपूजन होणार आहे.या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची रुग्णालये,मेडिकल दुकान लावण्यात येणार आहेत. चाकी व दुचाकी पार्किंग व्यवस्था ,निवास व्यवस्था,भोजन व्यवस्था ,सर्व सोयी असणार आहे.या कथा सात दिवस चालणार आहेत.शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी हा भव्य -दिव्य कार्यक्रम आपला समजून तन-मन-धन ने व सेवेने सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी व उपस्थित जेष्ठ नागरिकांनी केले आहे.या प्रसंगी शहर व ग्रामीण भागातील महिला,गंगापूर, येवला तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.आयोजक कैलास शेठ साखरे, महेंद्र काटकर,गोकुळ पेहरकर,अण्णा अधिकार,अशोक पवार,कैलास पवार, दशरथ बनकर,प्रेम राजपूत,जितेंद्र
पवार, उल्हास ठोंबरे, पंकज ठोंबरे, दिनेश राजपूत, सुरेश तांबे,राम उचित,राजेंद्र लालसरे,सुधीर लालसरे,मनोज दौडे,गौरव दौडे,विलास रामैया, धीरज वर्मा,शैलेश चव्हाण,बापू गावडे,बाबा पुतळे श्री,शहाणे, ,तसेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर,धार्मिक क्षेत्रातील सर्व नागरिक पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी विशाल शेठ संचेती व कैलास शेठ साखरे यांनी आभार मानले.(फोटो कॅप्शन-शिवमहापुराण कथेच्या नियोजन कार्यक्रला मोठ्या संख्येने उपस्थित महिला व पुरुष वर्ग).
 

No comments:

Post a Comment